एमबीबीएसच्या जागा २०० होणार

By Admin | Updated: January 7, 2015 01:27 IST2015-01-07T01:25:43+5:302015-01-07T01:27:21+5:30

पार्सेकर : गोमेकॉच्या जागा आणखी पन्नासने वाढविण्याचा प्रस्ताव

MBBS seats will be 200 | एमबीबीएसच्या जागा २०० होणार

एमबीबीएसच्या जागा २०० होणार

पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळात एमबीबीएसच्या जागांची संख्या सध्या १५० आहे. ती पन्नासपर्यंत खाली येणारच नाही. उलट येत्या वर्षी आम्ही गोमेकॉच्या जागा आणखी पन्नासने वाढवून त्या दोनशे करण्याचा प्रस्ताव भारतीय वैद्यकीय मंडळाकडे पाठवणार आहोत, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी येथे ‘लोकमत’ला सांगितले.
आम्हाला भारतीय वैद्यकीय मंडळाने ज्या सुविधा उभ्या करण्यास सांगितल्या होत्या, त्या आम्ही बांबोळी येथील गोमेकॉच्या परिसरात उभ्या केल्या आहेत. दोन व्याख्यान हॉल्स बांधले आहेत. एक प्रेक्षागृह बांधण्याचे काम मात्र पूर्ण झाले नाही. ते काम निश्चितच येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे गोमेकॉच्या सध्याच्या जागा दीडशेवरून शंभरपर्यंत खाली येणार नाहीत एवढे आपण अत्यंत विश्वासपूर्वक सांगू
शकतो. आम्ही प्रेक्षागृहाचे काम पूर्ण करणारच, असे मुख्यमंत्र्यांनी
सांगितले.
प्रेक्षागृह बांधून न झाल्याने तुमच्या जागा पन्नासने कमी का करू नयेत, अशी विचारणा मंडळाने केली होती. तशी विचारणा करण्याचा मंडळाला अधिकार आहे, असे पार्सेकर म्हणाले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: MBBS seats will be 200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.