शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आशियाई शहरांच्या परिषदेत पणजीच्या प्लास्टिक मुक्तीची यशोगाथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 13:42 IST

प्लास्टिक मुक्त पणजीसाठी महापालिकेनं १४ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मोहिमेला यश मिळालं आहे

पणजी: पणजी महापालिकेने १४ वर्षांपूर्वी घरोघरी कचरा संकलन करून विल्हेवाटीची जी पद्धत अवलंबिली आणि कालांतराने ही पद्धत कशी यशस्वी झाली तसेच पणजी शहर ९० टक्के प्लास्टिकमुक्त आणि कचरापेट्या मुक्त कसे झाले, याची यशोगाथा पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी नुकत्याच गोव्यात भरलेल्या दक्षिण आशियाई शहरांच्या शिखर परिषदेत सांगितली.परिषदेत उपस्थित देश-विदेशातील महापौरांना  तसेच नगराध्यक्षांना संबोधून मडकईकर म्हणाले की, १४ वर्षांपूर्वी महापालिकेने घरोघरी सुका आणि ओला कचरा वेगवेगळा करून संकलनाचे काम हाती घेतले, तेव्हा खरे म्हणजे ते मोठे आव्हान होते. त्यावेळचे महापालिका आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना कचरा विल्हेवाटीचे महत्व पटवून दिले आणि पालकांना याविषयी सांगण्यास सांगितले. याचा बराच परिणाम दिसून आला. पालकही कचऱ्याच्या बाबतीत जागृत झाले. प्लास्टिकमुक्तीच्या बाबतीत महापालिकेने गेल्या वर्षीच उद्दिष्टप्राप्ती केली आहे. पणजी शहर ९० टक्के प्लास्टिकमुक्त झालेले आहे. प्लास्टिक पिशव्या वापरताना दिसल्यास किंवा विकताना आढळल्यास ५ हजार रुपये दंड आकारला जात आहे. पणजी शहराला वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल गेल्या डिसेंबरमध्ये प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. कचरा विल्हेवाटीचे बाबतीत आता प्रत्येकी पाच टनाचे मिनी कचरा प्रकल्प शहरात उभे करण्याची महापालिकेची योजना आहे, असे महापौर मडकईकर म्हणाले.अलीकडेच शहरात सुरू केलेला पे पार्किंगचा विषयही महापौरांनी सहज आणि सोप्या भाषेत सांगितला. पार्किंगसाठी लवकरच मोबाईल ॲप आणले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दोनापावल येथील तारांकित हॉटेलात झालेल्या या दोन दिवसीय परिषद देश-विदेशातील १०० हून अधिक महापौर नगराध्यक्ष उपस्थित होते. या परिषदेत शहरांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. महापालिका तसेच पालिका प्रमुखांना प्रशासकीय अधिकार बहाल करण्याच्या दृष्टीनेही पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. गुजरातमधील सुरत महापालिकेचे महापौर डॉ. जगदीश पटेल यांनी गुजरातच्या ग्रामीण भागातून गरिबीमुळे सुरतमध्ये मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर तसेच झोपडपट्ट्यांचा उल्लेख केला. प्रधानमंत्री आवास योजनेखाली झोपडपट्टी निर्मूलनाचा कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आवास योजनेतून दीड लाख घरे बांधून दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील अनेक पालिकांचे नगराध्यक्ष या परिषदेत सहभागी झाले होते. अमरावतीच्या महापौर, वाईचे नगराध्यक्ष, श्रीनगरचे महापौर जुनैद अझीम मट्टू, अहमदाबादच्या महापौर श्रीमती बिजल पटेल याही सहभागी झाल्या होत्या. श्रीमती पटेल म्हणाल्या की, तेथे एका हॉस्पिटल इमारतीवर हेलिपॅडची सोय करण्यात आली आहे. जेणेकरून अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी इस्पितळात आणल्यास थेट इमारतीच्या छतावर उतरवून इस्पितळात आणले जाऊ शकते.नेपाळमधील धुलिखेल महापालिकेचे महापौर अशोक कुमार, बांगलादेशमधील एका महापालिकेचे महापौर दिवान अहमद, भूतानमधील एका पालिकेचे नगराध्यक्ष नाम गय थेशरिंग आदी या परिषदेत सहभागी झाले होते. या सर्वांनी त्यांच्या पालिका क्षेत्रातील अडीअडचणी समस्या तसेच यांच्यासमोरील आव्हाने या परिषदेत स्पष्ट केली. 

टॅग्स :goaगोवा