मडगावच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दरदिवशी एक लाखाचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 03:52 PM2019-08-31T15:52:35+5:302019-08-31T16:02:17+5:30

 मडगावात  दरदिवशी  चाळीस टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.

Margao Municipality to pay Rs. 1 Lakh per Day on garbage treetment | मडगावच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दरदिवशी एक लाखाचा खर्च

मडगावच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दरदिवशी एक लाखाचा खर्च

googlenewsNext

मडगाव: आतार्पयत  मडगाव पालिकेसमोर अनंत अडचणी निर्माण केलेल्या  कचरा समस्येने आता आणखी एक मोठी समस्या निर्माण केली असून यापुढे मडगाव पालिकेला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी  दररोज एक लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे दरमहा पालिकेला किमान तीस लाखांचा फटका बसणार आहे.
 
कचरा समस्येचा हा वाद दक्षिण गोवा सत्र न्यायालयासमोर पोहोचला असता पालिकेनेच स्वताहून कचरा प्रक्रियेसाठी दरदिवशी एक लाख रुपये फे डण्याचे मंजूर केले आहे. मडगावात  दरदिवशी चाळीस टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.  मात्र ही प्रक्रिया करणा:या फोमेंतो ग्रीन कंपनीने  मडगाव पालिकेकडून वेळेवर पैसे फेडले जात नाहीत असा दावा करुन  हा प्रक्रिया प्रकल्प बंद करण्याची नोटीस पालिकेला यापूर्वी दिली होती. 9 ऑगस्ट नंतर  मडगावातील कचरा प्रक्रियेसाठी स्वीकारला जाणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर हा वाद न्यायालयात पोहचल्यानंतर  31 ऑगस्टर्पयत प्रक्रिया करण्याचे काम चालू ठेवावे असा आदेश न्यायालयाने दिला होता. आता आज जारी केलेल्या आदेशाप्रमाणो ही कचरा प्रक्रि या 30 सप्टेंबर र्पयत  चालू रहाणार आहे.
 
मडगावची कचरा समस्या ही मडगाव पालिकेसाठी एक डोकेदुखी ठरली असून आतार्पयत  शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चार आस्थापनांचा वापर करुनही मडगाव पालिकेला अपेक्षित यश आलेले नाही. या पाश्र्वभूमीवर आता  नागरिकही  मडगाव पालिकेला लक्ष्य करत असून आतार्पयत  पालिकेने सोनसडय़ावर प्रयोग करुन  करदात्यांचे करोडो रुपये पाण्यात घालवले. त्यामुळे या पालिकेला आता आणखी प्रयोग करण्यासाठी नागरिकांना पिळता येणार नाही अशी प्रतिक्रिया मडगावातील नागरिक नवीन रायकर यानी व्यक्त केली आहे.
  
मडगावच्या या ज्वलंत समस्येकडे सरकारनेही दुर्लक्ष केले असून या समस्येवर तोडगा काढा अशी मागणी मडगाव पालिकेने मुयमंत्र्यांकडे करुनही अजुन या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पाऊले उचलली गेली नाहीत. त्यामुळे सरकारचेही मडगावकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना कित्येक मडगावकरांनी व्यक्त केली आहे.
 

Web Title: Margao Municipality to pay Rs. 1 Lakh per Day on garbage treetment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.