शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांनी आयुष्यभर जपल्या पर्रा येथील कलिंगडाच्या स्मृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 14:49 IST

म्हापशापासून काही अंतरावर असलेल्या ज्या पर्रा गावात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जन्मले त्या गावाची खासियत म्हणजे तेथील चविष्ट कलिंगड. पर्रीकर आपल्या भाषणांतून अनेकदा या कलिंगडांची खासियत सांगत असत.

ठळक मुद्देम्हापशापासून काही अंतरावर असलेल्या ज्या पर्रा गावात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जन्मले त्या गावाची खासियत म्हणजे तेथील चविष्ट कलिंगड. पर्रीकर आपल्या भाषणांतून अनेकदा या कलिंगडांची खासियत सांगत असत. पर्रा येथील या कलिंगडांशी जणू त्यांचे भावनिक नाते होते.

पणजी - म्हापशापासून काही अंतरावर असलेल्या ज्या पर्रा गावात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जन्मले त्या गावाची खासियत म्हणजे तेथील चविष्ट कलिंगड. पर्रीकर आपल्या भाषणांतून अनेकदा या कलिंगडांची खासियत सांगत असत. पर्रा येथील या कलिंगडांशी जणू त्यांचे भावनिक नाते होते. जाहीर सभांमधील भाषणे असो किंवा विधानसभेतील, एकही त्यांचे भाषण असे नसेल की ज्यामध्ये या कलिंगडांचा उल्लेख झालेला नसेल.

कलिंगडाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्मृतीही त्यांनी अनेकदा भाषणातून जागवल्या. ते म्हणत असत की, लहान असताना कलिंगड खाण्यासाठी आम्ही शेतावर जायचो तेव्हा शेतकरी मोठे कलिंगड खाण्यासाठी मोफत देत असत पण त्यांची एक अट असे, ती म्हणजे कलिंगड खाल्यानंतर तोंडात ज्या बिया राहतात त्या बाजूला टोपलीत टाकायच्या. आम्ही तसे करत असू आणि शेतकरी या बियांचे संवर्धन करून नंतर पुढील मोसमात नवे पीक घेण्यासाठी त्या बिया वापरत असत. त्यामुळे नवे पीकही मोठ्या कलिंगडांचे मिळत असे परंतु अलीकडच्या काळात ही पद्धत बंद झाली. दिवसेंदिवस कलिंगड छोटी होत गेली आणि आता या कलिंगडांना पूर्वीची सर राहिलेली नाही, अशी खंत ते व्यक्त करीत असत.

मुंबईतही जपल्या स्मृती

पर्रीकर सांगायचे की, मी मुंबईत पवई येथे आयआयटीमध्ये शिकण्यासाठी गेलो. तेथे शिक्षण पूर्ण करून तब्बल साडे सहा वर्षांच्या कालखंडानंतर मी पर्रा येथे आलो तेव्हा पूर्वीसारखी कलिंगड दिसली नाहीत. बाजारात फिरलो परंतु ती कलिंगड गायब झालेली होती. शेतकरी आम्हाला बालपणात केवळ बियांसाठी मोफत कलिंगडे खाऊ घालीत होता. त्याचा पुत्र आता शेती करू लागला होता. बाजारात चांगला दर मिळत असल्याने त्याने मोठी कलिंगडे मुलांना मोफत खाऊ देणे बंद केले होते. त्यामुळे त्याला बियाही मिळणे बंद झाले आणि बाजारात छोटी कलिंगड येऊ लागली.

पर्रीकर म्हणत की, दर २५ वर्षानंतर पिढी बदलते. आज आम्ही ज्या चुका करत आहोत त्याचे परिणाम दोनशे वर्षानंतरही दिसू शकतात.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा