लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आंब्यांचा राजा मानला जाणारा 'मानकुराद' सध्या बाजारात दाखल झाला असला, तरी त्याचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेरच आहेत. पणजी मार्केटमध्ये चांगल्या प्रतीचा व मोठ्या आकाराचा मानकुराद आंबा तब्बल पाच हजार रुपये प्रतिडझन दराने विकला जात आहे.
राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून आंब्याची आवक सुरू झाली असली, तरी दरामध्ये अपेक्षित घट झालेली नाही. हंगामाच्या सुरुवातीला 'मानकुराद'चा दर सहा हजार रुपये डझन होता. सध्या तो थोडा कमी झाला असला, तरी अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही.
याचबरोबर हापूस आंबाही बाजारात दाखल झाला असून, त्याचा दर १.५ ते २ हजार रुपये प्रतिडान आहे. तोतापुरी आंबा ५० रुपये प्रतिनग, तर लहान 'घोटे' आंबे ५०० रुपये डझन दराने विकले जात आहेत.
नीलम व इतर जातींचे आंबेही १ ते १.५ हजार रुपये प्रतिडझन दराने उपलब्ध आहेत. मात्र, एकूणच सर्व प्रकारचे आंबे अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने खवय्यांची नाराजी वाढताना दिसत आहे.
बाजारात आंब्याची आवक हळूहळू वाढत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. राज्यातील स्थानिक बागांमधून मानकुराद आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होऊ लागला आहे.
त्यामुळे पुढील आठवड्याभरात दरात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंबा विक्रेत्यांच्या मते, पुरवठा वाढल्याने दर नैसर्गिकरीत्या खाली येतील. त्यामुळे ग्राहकांना आणखी काही दिवस संयम बाळगावा लागणार आहे.
'मानकुराद'ला मोठी मागणी
गोव्यात मानकुराद आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणात असून, या आंब्याची चव इतर जातींपेक्षा अधिक गोड व सुगंधी मानली जाते. त्यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही या आंब्याला मोठी मागणी आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्यात मानकुराद आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. त्या काळात दरात मोठी घसरण होऊन ५०० ते १ हजार रुपये प्रतिडझन दरम्यान येतात. मात्र सध्या हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने दर उच्चांकी पातळीवर कायम आहेत.
Web Summary : Mankurad mangoes, though available, remain expensive, selling at ₹5,000/dozen in Panaji. Other varieties like Hapus are also costly. Prices are expected to drop as supply increases, but for now, mango lovers face disappointment due to high costs. Mankurad's unique taste drives demand.
Web Summary : मानकुराद आम बाजार में उपलब्ध होने पर भी महंगा है, पणजी में ₹5,000 प्रति दर्जन बिक रहा है। हापुस जैसी अन्य किस्में भी महंगी हैं। आपूर्ति बढ़ने पर कीमतों में गिरावट की उम्मीद है, लेकिन फिलहाल आम प्रेमी उच्च लागत के कारण निराश हैं। मानकुराद का अनूठा स्वाद मांग को बढ़ाता है।