वेश्या व्यवसायप्रकरणी कोलव्यात मध्य प्रदेशातील एक जण जेरबंद, दोन युवतींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 21:35 IST2020-07-31T21:34:24+5:302020-07-31T21:35:47+5:30

संशयित सिंग हा सदया तो फातोर्डा येथे राहात होता. गेली पंधरा वर्षांपासून गोव्यात तो वास्तव करून होता.

A man from Madhya Pradesh was arrested in Kolwa for prostitution and two young women were released | वेश्या व्यवसायप्रकरणी कोलव्यात मध्य प्रदेशातील एक जण जेरबंद, दोन युवतींची सुटका

वेश्या व्यवसायप्रकरणी कोलव्यात मध्य प्रदेशातील एक जण जेरबंद, दोन युवतींची सुटका

मडगाव: गोव्यातील कोलवा पोलिसांनी आज शुक्रवारी वेश्याव्यवसाय प्रकरणाचा पर्दाफाश करताना मूळ मध्य प्रदेश राज्यातील विजय सिंग (३७) या इसमाला जेरबंद केले. तर दोन युवतींची सुटका केली. त्यातील एक महाराष्ट्रातील असून, दुसरी कोलकाता येथील आहे. संशयित सिंग हा सदया तो फातोर्डा येथे राहात होता. गेली पंधरा वर्षांपासून गोव्यात तो वास्तव करून होता.

आज दुपारी तो कोलवा येथील पार्किग जागेवर दोन युवतीसमवेत येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मेलिटो फर्नांडीस, पोलीस शिपाई विकास कौशिक व रोहन नाईक व अन्य पोलिसांनी सापळा रचून संशयित दुचाकीवर आला असता, त्याला ताब्यात घेउन नंतर रितसर अटक केली. वेश्या व्यवसाय प्रतिबंधात्मक कायदयाखाली संशयितावर गुन्हा नोंद केला असून, पुढील पोलीस तपास चालू आहे.

Web Title: A man from Madhya Pradesh was arrested in Kolwa for prostitution and two young women were released