शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बेकायदा मासेमारीप्रकरणी गोव्याच्या आमदाराला मालवण तहसीलदारांची नोटीस   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 19:19 IST

एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारी करण्यास बंदी असतानाही सिल्वेरा यांच्या मालकीच्या ट्रॉलरने बंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप

पणजी  - सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना बेकायदा एलईडी मासेमारी प्रकरणात मालवणच्या तहसीलदारांनी नोटिस बजावली असून आज बुधवारी सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. सिल्वेरा यांचा ट्रॉलर चार दिवसांपूर्वी मालवण समुद्रात एलईडी दिवे वापरुन बेकायदेशीररित्या मासेमारी करताना पकडण्यात आला होता. 

एलईडी दिव्यांचा वापर करुन मासेमारी करण्यास बंदी आहे. असे असतानाही सिल्वेरा यांच्या मालकीच्या या ट्रॉलरने बंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. १९८१ च्या महाराष्ट्र सागरी मच्छिमारी कायद्यानुसार तहसीलदारांनी ही नोटीस त्यांना बजावली असून ते उपस्थित न राहिल्यास अनुपस्थितीत प्रकरण निकालात काढले जाणार असल्याचे म्हटले आहे. 

मालवणच्या गस्ती नौकेवरील मच्छिमारी अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी मालवणमध्ये पकडला होता. ट्रॉलरवर सुमारे ६0 हजार रुपये किमतीची मासळी होती. मच्छिमारी अधिकाऱ्यांनी नंतर हे प्रकरण महसूल खात्याकडे पाठवले. आमदार सिल्वेरा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

दरम्यान, गोव्यात पारंपरिक मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या ‘गोंयच्या रांपणकारांचो एकवोट’ या संघटनेचे अध्यक्ष आग्नेल रॉड्रिग्स यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, ‘ आमदार सिल्वेरा यांचा ट्रॉलर पकडला गेला ही सरकारसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. गोव्यात एलईडी मच्छिमारीबंदी अंमलात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे.’

 

टॅग्स :goaगोवाMLAआमदारsindhudurgसिंधुदुर्ग