शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

नौदलाचा रनवे कंट्रोल विभाग आणि एटीसीच्या सतर्कतेमुळे दाभोळी विमानतळावर टळला मोठा अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 6:38 PM

‘रनवे कंट्रोल’ विभाग आणि आणि ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’ विभागाच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे जीव...

 वास्को: दाबोळी विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘स्पाईस जेट’ विमानाची चाके उघडली नसल्याचे ‘रनवे कंट्रोल’ विभागाच्या अधिकाऱ्याला दिसून येताच त्यांनी ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’ विभागाला माहिती देऊन विमानाच्या वैमानिकाला संदेश दिल्याने मंगळवारी (दि. १७) दाबोळी विमानतळावर होणारा मोठा अपघात टळला. ‘स्पाईस जेट’ विमानाची चाके उघडली नसल्याचे कळताच वैमानिकाने धावपट्टीवर विमान न उतरविता उड्डाण घेऊन दुसऱ्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तेव्हा सुद्धा चाके उघडली नसल्याने तिसऱ्यांदा उड्डाण घ्यावी लागली.तिसऱ्या वेळी ह्या विमानाची चाके काही प्रमाणात उघडल्यानंतर सदर विमान दाबोळी विमानतळ धावपट्टीवर सुरक्षितरीत्या उतरविण्यात आले.मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास सदर घटना घडली. सुरत, गुजरातहून गोव्यात पोचल्यानंतर दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर ‘स्पाईस जेट’ चे (एसजी ३५६८) विमान उतरण्याच्या प्रयत्नात असताना विमानाची चाके (नोझ लँडिंग गियर) उघडली नसल्याचे नौदलाच्या ‘रनवे कंट्रोल’ विभागाचे प्रमुख एअरम रमेश टीग्गा यास दिसून आले. चाके उघडली नसल्याने विमान उतरविल्यास मोठा अपघात घडणार याची जाणीव असल्याने याबाबत त्वरित ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर’ ला माहिती देण्यात आली. यावेळी येथे कामावर असलेले अधिकारी लेफ्टनंट कमांडर हरमीत कौर यांनी त्वरित विमानाच्या वैमानिकाला संपर्क करून चाके उघडलेली नसल्याने विमान धावपट्टीवर न उतरविता पुन्हा उड्डाण घेण्याचा संदेश दिला. त्यानुसार वैमानिकाने पुन्हा उड्डाण घेऊन दुसऱ्यांदा ते धावपट्टीवर उतरविण्याचा प्रयत्न केला, मात्र तेव्हा चाके बाहेर आली नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विमानाला तिसऱ्या वेळी उड्डाण घ्यावी लागली. तिसऱ्यां प्रयत्नात विमानाची चाके काही प्रमाणात बाहेर आल्यानंतर सकाळी ८ च्या सुमारास ‘स्पाईस जेट’ चे विमान सुरक्षितरीत्या दाबोळी विमानतळावर उतरविण्यात आले.यानंतर विमानाला काही धोका निर्माण झाला आहे का याची तपासणी करून प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पूर्ण खात्री करून घेतली. दाबोळी विमानतळावर मंगळवारी सकाळी उतरत असलेल्या ह्या विमानाची चाके उघडलेली नसल्याचे वेळेवरच ‘रनवे कंट्रोल’ विभागाला कळताच व यानंतर त्वरित विमानाच्या सुरक्षेसाठी उचित पावले उचलल्याने येथे होणारा मोठा अनर्थ टळला.याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांना संपर्क केला असता शेवटी विमान सुरक्षितरीत्या दाबोळी विमानतळावर उतरवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सदर स्पाईस जेट चे विमान ‘बंबार्डिअर’ पद्धतीचे असून, ही विमाने छोटी असत असल्याचे संचालक गगन मलिक यांनी माहीती सांगितले. घटनेच्या वेळी या विमानात केवढे प्रवासी होते याबाबत संचालक मलिक यांना विचारले असता या विमानाची प्रवासी हाताळण्याची क्षमता ६० ते ७० च्या आसपास असत असल्याचे सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘स्पाईस जेट’ च्या या विमानात झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्याच्या कामाला नंतर सुरवात करण्यात आली.

टॅग्स :Airportविमानतळairplaneविमानspicejetस्पाइस जेटgoaगोवा