शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: "उद्धव ठाकरेंबद्दल आदर पण शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेस-NCP ची साथ सोडली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:12 IST

महाराष्ट्रात जी आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत झाली त्यांच्यााविरोधात हे सगळं करण्यात आले असा दावा शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केला.

गोवा - काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना उमेदवारासमोर पराभूत झालेल्या नेत्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. आम्ही पक्षप्रमुखांना या तक्रारी मांडल्या. राज्यसभेचा शिवसेनेचा उमेदवार पडला. महाविकास आघाडीत राहून आमचा काय उपयोग होता? सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. मग नेमंक काय झाले याची विचारणा पक्षप्रमुखांनी करायला हवी होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर कुठलेही सेलिब्रेशन आमच्या आमदारांनी केले नाही. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 

आमदार दीपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रात जी आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत झाली त्यांच्यााविरोधात हे सगळं करण्यात आले. उद्धव ठाकरेंचे मन दुखवावे, अपमान व्हावा असा कुठलाही हेतू नव्हता. काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढताना स्वकीयांशीही लढावं लागले. आम्ही दीड वर्ष झाले आपली नैसर्गिक युती आहे. ज्यांच्यासोबत आपण निवडणूक लढलो त्यासोबत आपण राहावं ही आमची भूमिका होती. वेळोवेळी आमदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला. संभ्रमावस्था निर्माण होईल अशी वक्तव्ये, बातम्या पसरवल्या गेल्या असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमदार एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. मंत्रिमंडळाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेतले जात नाहीत. आमदारांमध्ये चलबिचल होईल यासाठी मंत्रिमंडळाची संभाव्य यादी पसरवली गेली. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. आमच्या नेत्याशी आम्हाला अप्रत्यक्ष लढावं लागलं. आमची भूमिका विचारात न घेतल्याने हा संघर्ष निर्माण झाला. भाजपासोबत आमची मंत्रिमंडळाबाबत कुठलीही चर्चा नाही. एकही आमदार मंत्रिपदाच्या आशेने आले नाहीत. जे आलेत त्यातील ६ विद्यमान मंत्री होते. बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार होता तो पुढे घेऊन जाण्यासाठी ते यात सहभागी झाले असल्याचं दीपक केसरकर म्हणाले. 

कुणीही वाईट वाटून घेऊ नये कार्यकर्त्यांना आमच्या मागे लावले गेले. वाहनं आमची पाठलाग करत होते. त्यामुळे नेते दुखावले गेले. शिवसेनेत ठाकरे कुटुंबावर कुणाचा विरोध नाही. आमचा विधिमंडळ पक्ष आहे. या विधिमंडळ पक्षाला मान्यता आहे. १४ आमदारांच्या सहाय्याने ४० जणांनी निवडलेल्या नेत्याला काढून टाकण्यात आले. आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना विनंती करत होतो. महाविकास आघाडीशी साथ सोडा असं पत्र दिले. परंतु शेवटपर्यंत मविआची साथ सोडली नाही. आदर, विश्वास, प्रेम प्रत्येक आमदारांना उद्धव ठाकरेंबद्दल आहे. आम्ही मुदत दिली होती त्यानंतर हे पाऊल उचललं आहे. कुणीही वाईट वाटून घेऊ नये असं केसरकरांनी म्हटलं.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा