मडगावचा विद्यार्थी फ्रेडियरची प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 14:08 IST2018-01-24T14:07:36+5:302018-01-24T14:08:50+5:30
26 जानेवारीला नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेण्यासाठी मडगावच्या लॉयोला हायस्कूलचा नववीचा विद्यार्थी फ्रेडियर वाझ याची निवड करण्यात आली.

मडगावचा विद्यार्थी फ्रेडियरची प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये निवड
मडगाव- 26 जानेवारीला नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेण्यासाठी मडगावच्या लॉयोला हायस्कूलचा नववीचा विद्यार्थी फ्रेडियर वाझ याची निवड करण्यात आली. तब्बल 13 वर्षानंतर या परेडसाठी निवडण्यात आलेला पहिलाच शालेय विद्यार्थी होण्याचा मान त्याने मिळवला आहे. या परेडमध्ये तो 1 गोवा एनसीसी बटालियनचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
उत्कृष्ट छात्र सैनिक असलेला फ्रेडियर हा गिटार वादकही असून या परेडमध्ये निवडण्यापूर्वी त्याने धारवाड, बेळगावी, गदग, म्हैसुरु, बंगळुरु अशा विविध जागी आयोजित केल्या दहापेक्षा अधिक प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला असून या परेडमध्ये आपली निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना या परेडमध्ये आपल्याला वेगळाच अनुभव मिळेल अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. मूळ कासावली येथील फ्रेडियर कोकण रेल्वेत काम करणाऱ्या विल्सन व एस्तेरेलिया वाझ यांचा पुत्र आहे.