मडगाव-नागपूर रेल्वे पुढील सूचनेपर्यंत धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2025 08:03 IST2025-01-02T08:03:34+5:302025-01-02T08:03:38+5:30
आठवड्यातून दोनदा धावणारी विशेष रेल्वे १ जानेवारी २०२५ पासून पुढील सूचना येईपर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतलेला आहे.

मडगाव-नागपूर रेल्वे पुढील सूचनेपर्यंत धावणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : मडगाव-नागपूर ही आठवड्यात दोनदा धावणारी रेल्वे पुढील सूचना येईपर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतलेला आहे. गाडी क्र. ०११३९ नागपूर-मडगाव ही आठवड्यातून दोनदा धावणारी विशेष रेल्वे १ जानेवारी २०२५ पासून पुढील सूचना येईपर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतलेला आहे.
त्याचप्रमाणे गाडी क्र. ०११४० मडगाव नागपूर ही आठवड्यातून दोनदा धावणारी स्पेशल रेल्वे २ जानेवारी २०२५ रोजीपासून पुढील सूचना येईपर्यंत चालूच ठेवण्यात येणार आहे. या रेल्वेमध्ये एकूण २४ डबे असतील. त्यातील एक डबा २ टायर एसी, ३ टायर एसीचे ५ डबे, स्लीपरचे ११ डबे, जनरलचे ५ डबे व 'एसएलआर'साठी २ डबे मिळून २४ डबे असतील. या रेल्वेला सावंतवाडी रोड हा एक अतिरिक्त थांबा देण्यात आलेला असून या थांब्यावर ही रेल्वे फक्त दोन मिनिटे थांबणार आहे.
नागपूर मडगाव मार्गावरील गाडी क्र. ०११३९ रेल्वे दुपारी १२.५६ वा. सावंतवाडी रोडला पोहोचेल व २ मिनिटांचा थांबा घेतल्यानंतर १२.५८ मिनिटावर सुटेल. त्याचप्रमाणे मडगाव - नागपूर दरम्यान धावणारी गाडी क्र. ०११४० रेल्वे सावंतवाडी रोड येथे रात्री ९.४८ मिनिटावर पोहोचले व रात्री ९.५० वाजता सुटणार आहे.