शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
5
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
6
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
7
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
8
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
9
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
10
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
11
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
12
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
13
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
14
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
15
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
16
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
17
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
18
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
19
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
20
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...

गोव्यातील मिरामार किनाऱ्यावरील ‘लकी सेव्हन’ 70 दिवसांनी हटविलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 18:59 IST

तब्बल सत्तर दिवसांनी मिरामार किनाऱ्यावरील गोल्डन ग्लोबल हॉटेल्स प्रा. लिमिटेड कंपनीच्या ‘लकी सेव्हन’ या जहाजाला अखेर गुरुवारी सकाळी मांडवी नदीत आणण्यात यश आले आहे.

ठळक मुद्दे तब्बल सत्तर दिवसांनी मिरामार किनाऱ्यावरील गोल्डन ग्लोबल हॉटेल्स प्रा. लिमिटेड कंपनीच्या ‘लकी सेव्हन’ या जहाजाला अखेर गुरुवारी सकाळी मांडवी नदीत आणण्यात यश आले आहे. या जहाजामुळे आता मांडवी नदीत सहावा कॅसिनो सुरू होणार हे निश्चित झाले झाले असून, किमान दोन महिन्यांत हे कॅसिनो जहाज दुरुस्त होऊन पुन्हा गोव्यात परतणार आहे. 

पणजी - तब्बल सत्तर दिवसांनी मिरामार किनाऱ्यावरील गोल्डन ग्लोबल हॉटेल्स प्रा. लिमिटेड कंपनीच्या ‘लकी सेव्हन’ या जहाजाला अखेर गुरुवारी सकाळी मांडवी नदीत आणण्यात यश आले आहे. या जहाजामुळे आता मांडवी नदीत सहावा कॅसिनो सुरू होणार हे निश्चित झाले झाले असून, किमान दोन महिन्यांत हे कॅसिनो जहाज दुरुस्त होऊन पुन्हा गोव्यात परतणार आहे. 

जुलै महिन्याच्या 14 तारखेला हे कॅसिनो जहाज एमपीटी बंदराकडे जाण्यापूर्वी खराब हवामानामुळे काबो आणि अग्वाद लाईट हाऊसच्या मध्यभागी नांगरून ठेवले होते. त्यानंतर समुद्री वाऱ्यामुळे भरकटले आणि मिरामार किनाऱ्यावर येऊन रुतुन बसेल. हे अडकलेल्या जहाजाचा मुद्दा पोटनिवडणुकीतही गाजला. विरोधकांपासून अनेक सामाजिक संस्थांनी राज्य सरकारला याबाबत दोष दिला होता. किनाऱ्याची ङिज आणि जहाज काढण्यास येणऱ्या अपयशामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात गेले. खंडपीठाने हे जहाज वेळेत न काढल्यास जप्त करण्याची कंपनीला तंबीही दिली होती. मात्र, पाऊस आणि खराब हवामानामुळे येणाऱ्या अडचणींने या जहाजाचा मुक्काम वाढत गेला. खंडपीठाने 27 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत संबंधित कंपनीला अखेरची मुदत ही 9 ऑक्टोबर दिली होती, त्यापूर्वीच हे जहाज काढण्यात यश आले. दरम्यान, कंपनीचे मालक हरयाणाचे मंत्री गोपाल कांडा यांचे बंधू गोविंद कांडा यांनी 4 ऑक्टोबर्पयत ते जहाज हटविले जाईल, असे सांगितले होते. पण खंडपीठाने वाढवून दिलेली मुदत कंपनीला फायदेशीर ठरली आणि 5 ऑक्टोबरला या जहाजाने मिरारार किनारा सोडला. 

दरम्यान, बंदर कप्तान खात्याचे संचालक जेम्स ब्रागांझा यांनी सांगितले की, सकाळी संबंधित कंपनीला जहाज काढण्यात यश आले. पाण्याखाली जाऊन त्याची पाहणी केल्यानंतर ते तेथून जयगड ड्रायडॉकमध्ये जाईल, त्यानंतर त्याची दुरुस्ती होईल. आत्तार्पयत आम्ही खात्याची जी भूमिका होती, त्यानुसार भूमिका पार पाडली आंहे. जहाज काढण्यात आलेल्या अपयशामुळे त्या कंपनीने केलेल्या विनंतीनुसार आम्ही सहकार्य केले आहे, असे ब्रागांझा म्हणाले. 

45 मिनिटांत ऑपरेशला यशपाण्याची जहाज हटविण्यासाठी आवश्यक असणारी पाण्याची भरती होती. सकाळी 8.30 वाजता एमपीटीच्या दोन टगबोटी दाखल झाल्या. 9.50 मिनिटांनी जहाज दोर बांधून ओढण्यास टगबोटींनी सुरुवात केली आणि 1क् वा. ते मांडवी नदीत ओढत आणण्यात यश आले. राज्य सरकार, एमपीटी, बंदर कप्तान खात्याने केलेल्या केलेल्या सहकार्याबद्दल कांडा यांनी आभार मानले. 

दहा कोटींचा खर्चया अडकलेल्या जहाजाला काढून समुद्रात ओढण्याचा ठेका मुंबईच्या अरहिंत शिप ब्रेकर्सला दिले होते, पण त्यांना त्यात यश आले नाही. त्यानंतर कंपनीने दुबईच्या मे. एएमएस मरीन एलएलसी या कंपनीला दिल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात जहाज समुद्रात ओढण्यात 8क् टक्के यश आले होते. या जहाजाला हटविण्यासाठी आत्तार्पयत दहा कोटी खर्च आल्याचे मालक गोविंद कांडा यांनी सांगितले.

जयगड येथे दुरुस्तीजहाज सध्या मांडवी नदीत वेरेच्या बाजूस नांगरून ठेवले असून, त्याचे सर्वेक्षण दोन दिवस केले जाणार आहे. तळाला किती नुकसान झाले आहे, याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर ते जयगड (रत्नागिरी) ड्रायडॉकमध्ये नेले जाणार आहे. दोन महिन्यांत त्याची पूर्ण दुरुस्ती होऊन ते जहाज पुन्हा मांडवीत आणला जाईल. अर्थात दोन महिन्यांत सहावा कॅसिनो सुरू होणार हे निश्चित झाले आहे. 

कॅसिनोला परवानगीया कॅसिनोला मुंबई उच्च न्यायालयाने जूनमध्येच परवानगी दिली होती. ऑफशोर कॅसिनोला परवानगी मिळाल्याने गोल्डन ग्लोब हॉटेल प्रा. लिमिटेड कंपनीने जुलै महिन्यात ते आणण्याची तयारी केली होती. या कंपनीचा हा दुसरा ऑफशोर कॅसिनो असून, या कॅसिनोचा परवाना नूतनीकरणासाठी कंपनीने सरकारला 5क् कोटी अगोदरच भरले आहेत. बाकीची 5 कोटी शुल्कही भरलेले आहे. महिन्याला एक कोटी असे 12 कोटी वर्षाला भरावे लागतील, असे कांडा यांनी माध्यमांना सांगितले.