शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

गोमंतकीयांच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आज पणजीत गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 07:36 IST

गोवन ऑफ द इयर पुरस्कारांचे वितरण.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: लोकमत मीडियातर्फे आयोजित 'गोवन ऑफ द इयर अवॉर्ड २०२७'चा रंगारंग कार्यक्रम आज बुधवारी सायंकाळी ५ वा. हॉटेल गोवा मेरियटमध्ये होणार आहे. विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तर पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव खास अतिथी म्हणून उपस्थित असतील.

क्रीडा, आरोग्य, पर्यटन, शिक्षण, पर्यावरण, कला व संस्कृती, पोलिस अधिकारी, रेस्टॉरंट, प्रशासकीय अधिकारी या विभागात मतदानाद्वारे निवडलेल्या विजेत्यांना या वेळी पुरस्कार वितरीत करण्यात येतील. प्रतापसिंग राणे यांनी गोवा विधानसभेत ५० वर्षे प्रतिनिधित्व केले. गोव्याचे राजकारण, समाजकारण, कृषी व इतर क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांची जीवन गौरव पुरस्कारासाठी एकमताने निवह करण्यात आली आहे.

दशकातील सर्वात यशस्वी नेता म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गौरविण्यात येणार आहे. एक युवा आमदार ते मुख्यमंत्री असा विलक्षण प्रवास करत आपला एक वेगळा ठसा राज्याच्या राजकारणावर त्यांनी उमटवलेला आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी म्हणून डॉ. व्ही. कांदावेलू यांचाही सन्मान होणार आहे. त्यांनी यापूर्वी प्रधान वित्त सचिव म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर ते आता मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. एक प्रामाणिक आणि लोकांप्रति कळकळ असलेला अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे

पुरस्कारांची प्रक्रिया अत्यंत पारदर्शी पद्धतीने करण्यात आली. प्रत्येक विभागातून नामांकने जाहीर करून लोकांकडून मते मागवण्यात आली होती.

नीलेश काब्राल यांना सक्षम विधिमंडळपटू म्हणून गौरविण्यात येणार आहे. विधानसभेतील बुलंद आवाज म्हणून ख्याती असलेल्या काब्राल यांनी नेहमीच लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवलेला आहे.

राज्यातील पायाभूत सुविधांसाठी अतुलनीय योगदान दिलेले अतुल भोबे यांचाही गौरव या कार्यक्रमात होणार आहे. पहिल्या इफ्फीच्या काळात आवश्यक त्या पायाभूत सुविधा जलदरीत्या उभारून त्यांनी वेगळा नावलौकिक मिळवला होता. तिसऱ्या मांडवी पुलाच्या उभारणीतही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांना गौरविण्यात येणार आहे. वृत्तपत्र तळागाळात पोचविण्यासाठी वापरलेल्या कल्पक योजना आणि वृत्तपत्राच्या आधुनिकीकरणात त्यांचे अमूल्य योगदान आहे.

वुमन अचिव्हर्स अवॉर्ड

लोकमत सखी मंच आपला रौप्य महोत्सव साजरा करत असल्याने गोवन ऑफ द इयर या कार्यक्रमात बारा तालुक्यांतून १२ महिलांना वुमन अचिव्हर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. लीना नाईक तारी (तिसवाडी), श्रद्धा गवंडी (फोंडा), श्रद्धा माशेलकर (पेडणे), स्वीजल प्रायासो (केपे), स्वीजल नाईक (काणकोण), अपर्णा आमोणकर (डिचोली), अंकिता माजिक (सत्तरी), डॉ. हेमली देसाई (सांगे), नियती मळगावकर (बार्देश), अँड. दिव्या गावकर (थारबांदोडा), डॉ. श्वेता इलकर (मुरगाव), डॉ. तन्वी कामत बांबोळकर (सासष्टी) यांचा त्यात समावेश आहे.

या मान्यवरांचा गौरव

जीवन गौरव पुरस्कार : प्रतापसिंग राणे दशकातील सर्वात यशस्वी नेता: डॉ. प्रमोद सावंत वरिष्ठ आयएएस अधिकारी: डॉ. व्ही. कांदावेलू सक्षम विधिमंडळपटूः नीलेश काब्रालपायाभूत सुविधांसाठी अतुलनीय योगदान : अतुल भोबे

पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदान : किरण ठाकुर 

टॅग्स :goaगोवाLokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंट