शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोव्यावर भारतीय संविधान लादले; काँग्रेस उमेदवार फर्नांडिस यांचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 11:19 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याविषयी संतप्त प्रतिक्रिया देताना विरियातो यांच्या विधानाचा कडक शब्दात समाचार घेतला

पणजी (गोवा) : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी वादग्रस्त दावा केला की, १९६१ मध्ये पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त झाल्यानंतर गोव्यावर भारतीय संविधान ‘जबरदस्ती’ने लादण्यात आले. 

फर्नांडिस यांनी एका प्रचारसभेत  बोलताना आठवण करून दिली की, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, गोवा स्वतःचे भवितव्य स्वतः ठरवेल’, परंतु तसे झाले नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते आम्ही राहुल गांधींसोबत झालेल्या भेटीदरम्यान हा मुद्दाही त्यांना सांगितला हाेता. वक्तव्यानंतर आपली बाजू मांडताना मंगळवारी फर्नांडिस म्हणाले, आपले विधान राजकीय लाभासाठी बदलून सांगितले जाऊ नये. गोव्याची ओळख नष्ट करणे, बेरोजगारी, महागाई यासारख्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आपण तयार आहोत. 

मुख्यमंत्री सावंत संतप्तमुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याविषयी संतप्त प्रतिक्रिया देताना विरियातो यांच्या विधानाचा कडक शब्दात समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा मनापासून विश्वास होता. उलट काँग्रेसने गोवा मुक्तीसाठी चौदा वर्षे उशीर केला. आता त्यांच्या उमेदवाराने भारतीय संविधानाची पायमल्ली करण्याचे धाडस केले आहे. काँग्रेसने हे भारत तोडो राजकारण ताबडतोब थांबवावे.

देशाचे तुकडे करण्याचा काँग्रेसचा डाव : पंतप्रधानगोव्यावर भारतीय राज्यघटना लादण्यात आली असे वक्तव्य काँग्रेस उमेदवार विरिएटो फर्नांडिस यांनी केले होते. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाचे तुकडे करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे. छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यात मंगळवारी एका प्रचारसभेत ते म्हणाले की, दलित, आदिवासी, मागासवर्गीय लोक सत्तेत सहभागी झाले आहे हे काँग्रेसला पचनी पडत नाही. दक्षिण भारताला वेगळा देश म्हणून जाहीर करावे अशी मागणी कर्नाटकातील काँग्रेस खासदाराने नुकतीच केली होती. आता गोव्यातील काँग्रेसचा उमेदवार म्हणतो की, भारतीय राज्यघटना गोव्याला लागू होत नाही. या उद्गारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होत नाही का? असा सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसsouth-goa-pcदक्षिण गोवाBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४