शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

गोव्यात प्रथमच भाजप-काँग्रेस यांच्यात कडवी झुंज; आजी-माजी केंद्रीय मंत्र्यांमध्ये लक्षवेधी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 10:49 IST

गेली पंचवीस वर्षे भारतीय जनता लोकसंख्या मतदार महिला मतदार पक्ष उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ जिंकतोय.

पणजी - सदगुरू पाटील

पणजी : गेली पंचवीस वर्षे भारतीय जनता लोकसंख्या मतदार महिला मतदार पक्ष उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ जिंकतोय. दोनवेळा भाजपने मध्यंतरी दक्षिण गोवा मतदारसंघही जिंकला होता. पण यावेळी दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपला आव्हानात्मक स्थिती आहे. दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात भाजपने तुलनेने सुरक्षित आहे. पण तिथेही आजी-माजी केंद्रीय मंत्र्यांमधील ही लढत लक्षणीय ठरू लागली आहे. तर, दक्षिण गोव्यात भाजपने प्रथमच महिला उमेदवाराला संधी दिली असली तरीही त्यांना निवडणूक आव्हानात्मक आहे.

एकूण मतदारसंघ

लोकसंख्या-१६ लाखमतदार-११.७९ लाखमहिला मतदार-६.०७पुरुष मतदार-५.७१ लाख

दक्षिण गोव्यात भाजपचा उमेदवार सर्वात श्रीमंत

भाजपने प्रथमच आपल्या केडरबाहेरील उमेदवार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून भाजपने प्रथमच महिलेला उमेदवारी दिली. पल्लवी धेपे ह्या गोव्यातील सर्वातश्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत. त्यांच्याकडे बाराशे कोटींची मालमत्ता आहे.त्या राजकारणात प्रथमच आल्या आहेत. त्यांना भाजपचे कार्यकर्ते व मतदार कशा प्रकारेस्वीकारतात ते अजून पहावे लागेल.

तर धेपे यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे केप्टन विरियातो फर्नांडिस हे लढत आहेत. विरियातोहे आयुष्यात प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

१९९९ पासून अभेद्य राहिलेला गड भाजप टिकविणार का?

• १९९९ सालापासून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे उत्तर गोव्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. ते एकदाही पराभूत झाले नाही. मात्र आता सहाव्यांदा लढताना नाईक यांची दमछाक होत आहे. कारण २५ वर्षे भाजपने उमेदवार बदलला नाही, म्हणून युवा मतदारांत थोडी चलबिचल आहे.

यावेळी माजी केंद्रीय कायदा मंत्री • रमाकांत खलप हे नाईक यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे लढत आहेत. नाईक यांच्या अकार्यक्षमतेवर आपण प्रचारावेळी भर देतोय, असे खलप सांगतात. उत्तर गोव्यातून रिवोलुशनरी गोवन्स ह्या पक्षातर्फे मनोज परब रिंगणात आहेत.

टॅग्स :goaगोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४