शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

गोव्यात कुठेच एकतर्फी लढत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 12:42 IST

उत्तर आणि दक्षिण गोवा असे दोन लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभेच्या तीन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. एकूण पाच मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात यावेळी निवडणूक एकतर्फी नाही.

ठळक मुद्देउत्तर आणि दक्षिण गोवा असे दोन लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभेच्या तीन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. एकूण पाच मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात यावेळी निवडणूक एकतर्फी नाही.मांद्रे, म्हापसा व शिरोडा या तीन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका आहेत. यापैकी शिरोडामध्ये भाजपाविरुद्ध मगोप अशी कडवी झुंज आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक हे भाजपाचे उमेदवार आहेत.

पणजी - उत्तर आणि दक्षिण गोवा असे दोन लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभेच्या तीन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. एकूण पाच मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात यावेळी निवडणूक एकतर्फी नाही. सर्व मतदारसंघांतील निवडणुकांमध्ये चुरस आहे.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. बहुतेक काँग्रेस उमेदवार दक्षिण गोव्यातून निवडून यायचे. त्या मतदारसंघातील सासष्टी तालुक्यात ख्रिस्ती मतदारांची संख्या बरीच मोठी असल्याने काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग सोप होत असे. मात्र यावेळी काँग्रेसने 73 वर्षीय फ्रान्सिस सार्दिन यांना तिकीट दिलं व सार्दिन यांचा प्रचार थोडा उशिराच सुरू झाल्याने त्यात जोष दिसून येत नाही. दक्षिण गोव्यात भाजपाचा उमेदवार फक्त दोनवेळा जिंकला. एकदा रमाकांत आंगले जिंकले होते व 2014 साली मोदी लाटेमुळे नरेंद्र सावईकर हे जिंकले. मात्र यावेळी सावईकर हे सार्दिन यांना जोरदार टक्कर देत आहेत. शिवाय आम आदमी पक्षाचे एल्वीस गोम्स हेही महत्त्वाचे उमेदवार आहेत. तेही ख्रिस्ती व हिंदू मते प्राप्त करतील. ख्रिस्ती मते जर त्यांनी जास्त प्राप्त केली तर सार्दिन यांच्यासाठी ती चिंतेची गोष्ट ठरू शकते. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर हे सार्दिन यांचा प्रचार करत आहेत. भाजपाचे सावईकर यांच्या प्रचारात मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे उतरले आहेत.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक हे भाजपाचे उमेदवार आहेत. नाईक हे पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे जात असल्याने उत्तरेत भाजपा कार्यकर्त्यांमधील जोष थोडा कमी दिसतो. त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे उमेदवार बनून टक्कर देत आहेत. नाईक हे लोकसभा निवडणुकीत कधीच हरलेले नाहीत ही भाजपाची जमेची बाजू आहे. मात्र चोडणकर यांनी प्रचाराच्या नवनव्या कल्पना राबविणो सुरू केले आहे. त्यांनी नुकतीच सायकल रॅलीही काढली.

मांद्रे, म्हापसा व शिरोडा या तीन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका आहेत. यापैकी शिरोडामध्ये भाजपाविरुद्ध मगोप अशी कडवी झुंज आहे. माजी मंत्री महादेव नाईक हे तिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत. म्हापशात माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचा पुत्र जोशुआ हा भाजपतर्फे रिंगणात उतरला आहे. काँग्रेसने अनुभवी नगरसेवक सुधीर कांदोळकर यांना रिंगणात उतरविले तरी, काँग्रेस पक्ष गेली 39 वर्षे म्हापशात कधी जिंकलेला नाही. 1980 साली काँग्रेस (अर्स) चा एकदाच विजय झाला होता. काँग्रेसने सुधीर कांदोळकर यांना तिकीट दिले असून कांदोळकर हे भाजपामधून बाहेर आले तरी, भाजपाचे जास्त कार्यकर्ते फुटले नाहीत. तरीही म्हापशात अटीतटीची लढत आहे. मांद्रे मतदारसंघात माजी आमदार दयानंद सोपटे आणि प्रथमच विधानसभा निवडणूक लढवणारे काँग्रेसचे बाबी बागकर व अपक्ष जित आरोलकर यांच्यात खरी लढत आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGoa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक 2019Politicsराजकारणgoaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा