लालकृष्ण अडवाणी प्रथमच सात दिवसांच्या गोवा भेटीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 06:57 PM2019-01-23T18:57:53+5:302019-01-23T18:58:48+5:30

माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे प्रथमच एकूण सात दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत. अडवाणी यांचे आगमन गुरुवारी 24 रोजी सायंकाळी होईल. ते 30 जानेवारीपर्यंत गोव्यात असतील.

LK Advani is on a seven-day visit to Goa for the first time | लालकृष्ण अडवाणी प्रथमच सात दिवसांच्या गोवा भेटीवर

लालकृष्ण अडवाणी प्रथमच सात दिवसांच्या गोवा भेटीवर

Next

पणजी - माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे प्रथमच एकूण सात दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत. अडवाणी यांचे आगमन गुरुवारी 24 रोजी सायंकाळी होईल. ते 30 जानेवारीपर्यंत गोव्यात असतील.

लालकृष्ण अडवाणी यांची ही खासगी भेट आहे. त्यांचा मुक्काम दोनापावला येथील राजभवनवर असेल. अडवाणी हे आयुष्यात कधीच एवढे दिवस गोव्यात राहिलेले नाहीत. अडवाणी यांच्या सुरक्षेसाठीची सगळी तयारी गोवा पोलिसांकडून केली जात आहे. राजभवन परिसरात जास्त सुरक्षा असेल. अडवाणी यांच्यासोबत गोवा भाजपचाही कोणताच कार्यक्रम ठरलेला नाही. अडवाणी हे खासगी भेटीवेळी नेमक्या कोणत्या कौटुंबिक किंवा अन्य कार्यक्रमामध्ये भाग घेतील याची कल्पना गोवा सरकारच्या शिष्टाचार खात्याला किंवा अन्य यंत्रणोला देण्यात आलेली नाही.

अडवाणी यांची भूमिका भाजपमध्ये राष्ट्रीय स्तरावर केवळ एका मार्गदर्शकाची आहे. अडवाणी हे भाजपमध्ये प्रमुख भूमिकेत होते तेव्हा त्यांच्या अनेक सभा गोव्यात झालेल्या आहेत. त्यांच्या अनेक पत्रकार परिषदाही गोव्यात झालेल्या आहेत. त्यांच्या यात्राही गोव्यातून पार पडलेल्या आहेत. मात्र यावेळी अडवाणी हे खासगी भेटीवर आहेत. ते राजभवनवर विश्रंतीही घेतील. राजभवनवर मुक्कामाची तयारी जोरात सुरू आहे, असे सुत्रंनी सांगितले. 

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे अलिकडील काळात दोनवेळा राजभवनवर राहून गेले आहेत. अरबी समुद्र व मांडवी नदीच्या संगमाच्या ठिकाणी वसलेल्या राजभवनवर निवास करणे  कुणालाही आवडते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या आठवडय़ात गोव्यात नव्या मांडवी पुलाचे उद्घाटन करण्यासाठी यावे असा प्रयत्न गोवा सरकारने केला होता पण मोदी यांनी आपण येऊ शकत नाही असे कळविले आहे. पंतप्रधानांनी नुकताच दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकत्र्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्याचप्रमाणो ते येत्या 27 रोजी उत्तर गोव्यातील भाजप कार्यकत्र्याशी संवाद साधतील.

Web Title: LK Advani is on a seven-day visit to Goa for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.