शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

गोमेकॉप्रमाणे द. गोवा इस्पितळ सुसज्ज करा! दिगंबर कामत यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2024 09:46 IST

या हॉस्पिटलकडे सध्या खूप दुर्लक्ष होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोमेकॉ अत्याधुनिक साधन- सुविधांनी दिवसेंदिवस विकसित होत चालले आहे. राज्याच्या दृष्टीने ही कौतुकास्पद बाब आहे. पण याचबरोबर गोमेकॉवरील ताणही वाढला आहे. त्यामुळे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात गोमेकॉप्रमाणे साधनसुविधा पुरवल्या तर गोमेकॉवरील ताण निश्चितच कमी होईल. सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी आमदार दिगंबर कामत यांनी काल विधानसभेत केली.

गोमेकॉ एवढे प्रसिद्ध आहे की, सावंतवाडी, कारवारसह इतर भागातील लोक येथे उपचारासाठी येत असतात. त्यामुळे गोमेकॉवर ताण वाढत आहे. जर जिल्हा हॉस्पिटल साधन-सुविधांनी सज्ज केले तर दक्षिणेतील अनेक लोक गोमेकॉत न येता तिथेच उपचार घेतील, असे कामत यांनी सांगितले.

या हॉस्पिटलकडे सध्या खूप दुर्लक्ष होत आहे. येथे कुठल्याच प्रकारची मोठी सुविधा उपलब्ध नाही. कर्मचारी, डॉक्टर्सदेखील तुलनेत कमी आहेत. अशावेळी या हॉस्पिटलचा दक्षिणेतील लोकांना काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे लोकांना प्रवास करून गोमेकॉत यावे लागते. आरोग्यमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष घालून ही समस्या सोडवावी, असेही कामत म्हणाले.

गांभीर्याने लक्ष द्या...

दक्षिण गोवा इस्पितळ सुसज्ज करण्याची मोठी गरज आहे. आरोग्य खात्याने या इस्पितळाच्या अवस्थेकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी. हे इस्पितळ अद्ययावत झाल्यास गोमेकॉवरील मोठा ताण कमी होणार आहे, असे दिगंबर कामत यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाhospitalहॉस्पिटलVidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभा