म्हादईसाठी आता पुन्हा रस्त्यावर येऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:28 IST2025-04-11T13:27:38+5:302025-04-11T13:28:10+5:30

सेव्ह म्हादई सेव्ह गोवा फ्रंटतर्फे पणजी आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

let get back on the road for mhadei river issue | म्हादईसाठी आता पुन्हा रस्त्यावर येऊ

म्हादईसाठी आता पुन्हा रस्त्यावर येऊ

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कर्नाटकने कणकुंबी येथे कळसा प्रकल्प पूर्ण केला असून आता भांडुरा प्रकल्पाचे कामही जोरात सुरू आहे तर आमचे सरकार भिवपाची गरज नाही, असे म्हणत लोकांची दिशाभूल करीत आहे. आता राज्यातील सर्व जनतेने पुन्हा एकादा रस्त्यावर येण्याची गरज आहे. तो पर्यंत राज्य सरकार तसेच केंद्र सरकारला म्हादईचा प्रश्न गांभीर्याने घेणार नाही, असे सेव्ह म्हादई सेव्ह गोवा फ्रंटतर्फे गुरुवारी पणजी आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

यावेळी अॅड. हृदयनाथ शिरोडकर, प्रा. प्रजल साखरदांडे व महेश म्हांबरे उपस्थित होते. अॅड. हृदयनाथ शिरोडकर म्हणाले, या म्हादईचे पाणी कर्नाटक सरकार लोकांना पिण्यासाठी नाही, तर येथे आता स्टील लॉबी येत आहे. या उद्योगपतीच्या हितासाठी या म्हादईचे पाणी वळविले जात आहे. आता कणकुंबी व आजूबाजूच्या परिसरातील गावच्या लोकांना या म्हादईचे पाणी वळविणार विरोध केला आहे. पण कर्नाटक सरकार त्यांच्या या विरोधाला न मानता आपले काम सुरूच ठेवले आहे, तर गोवा सरकार मात्र काहीच करीत नाही असे ते म्हणाले.
 

Web Title: let get back on the road for mhadei river issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा