चार धरणांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2024 08:06 AM2024-04-05T08:06:21+5:302024-04-05T08:06:59+5:30

मात्र जूनअखेरपर्यंत कोणतीही समस्या उद्भवणार नसल्याचा जलस्रोत मुख्य अभियंत्यांचा दावा

less than 50 percent water storage in four dams in goa | चार धरणांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा

चार धरणांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : साळावलीसह राज्यातील चार प्रमुख धरणांमधील जलाशयातील पाण्याची पातळी ५० टक्क्यांपेक्षा खाली उतरली आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवर पडल्यास पाण्याची समस्या निर्माण होईल की काय, अशी लोक व्यक्त करीत आहेत.

जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी मात्र तशी कोणतीही समस्या उद्भवणार नसल्याचे सांगताना पुरेसे कच्चे पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, जून अखेरपर्यंत पुरेल एवढे पाणी आहे.

राज्याच्या काही भागात तीव्र पाणीटंचाई असताना नेते परराज्यांत प्रचार दौरे करत असल्याबद्दल काँग्रेसचे सुनील कवठणकर यांनी टीका केली आहे.

जलाशयात सध्या किती पाणी? 

साळावली ४९ टक्के
अंजुणे ३८ टक्के
चापोली ५८ टक्के
आमठाणे ३७ टक्के
पंचवाडी ३९ टक्के
गावणे ५६ टक्के
 

Web Title: less than 50 percent water storage in four dams in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.