शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

अपंगांसाठी कायद्याची अंमलबजावणी; गोव्यात निराशाजनक स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 19:07 IST

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये द राईट्स ऑफ पर्सन्स वीथ डिसेबिलीटीज (आरपीडब्ल्यूडी) हा कायदा संमत होऊन दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तरी, अजून विविध राज्यांमध्ये कायद्याचे नियम तयार करणे तसेच अंमलबजावणी याविषयी निराशाजनक स्थिती आहे.

पणजी : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये द राईट्स ऑफ पर्सन्स वीथ डिसेबिलीटीज (आरपीडब्ल्यूडी) हा कायदा संमत होऊन दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तरी, अजून विविध राज्यांमध्ये कायद्याचे नियम तयार करणे तसेच अंमलबजावणी याविषयी निराशाजनक स्थिती आहे. राष्ट्रीय स्तरावरील यंत्रणांनी याविषयी केलेल्या सर्वेक्षणावेळी गोवा या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत सोळाव्या स्थानी असल्याचे आढळून आले.

गोव्यासारख्या छोट्या राज्याला सोळावे स्थान मिळणे हे लज्जास्पद आहे, अशी प्रतिक्रिया येथे विशेष व्यक्तींसाठी काम करत असलेल्या एनजीओंमध्ये व्यक्त होत आहे. डिसेबिलीटी राईट्स इंडिया फाऊंडेशनने नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लोयमेन्ट फॉर डिसेबल्ड पिपल व नॅशनल कमिटी ऑन द राईट्स ऑफ पर्सन्स वीथ डिसेबीलीटीज या संस्थांच्या सहकार्याने सर्वेक्षण केले. सर्वेक्षणावेळी सर्व राज्यांना प्रश्नावली पाठवली गेली. एकूण चोवीस राज्यांनी प्रतिसाद दिला.

आरपीडब्ल्यूडी हा कायदा दि. 16 डिसेंबर 2016 रोजी संमत करण्यात आला होता. देशातील 58.3 टक्के राज्यांनी केंद्राच्या या कायद्यांतर्गत नियम तयार केले नाहीत. देशात एकूण 21 राजभाषा आहेत. पण कायदा फक्त हिंदी व ओडिसा या दोन्हीच भाषांमध्ये अनुवादित करून उपलब्ध केला गेला आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या चोवीस राज्यांपैकी 50 टक्के राज्यांनी राज्य सल्लागार मंडळ नियुक्त केलेले नाही. तसेच 83.3 टक्क्क्यांनी जिल्हा समित्या स्थापन केलेल्या नाहीत. 

गोव्यात अपंग व्यक्तींसाठी सरकारी आयुक्त आहे पण 24 पैकी 37.5 टक्के राज्यांकडे आयुक्त नाही. अनेक राज्यांकडे पूर्णवेळ आयुक्त नाही. केवळ तीनच राज्यांनी आयुक्तांना सहाय्य करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्लागार समिती नेमल्या आहेत. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 80 टक्के राज्यांनी राज्य निधी स्थापन केलेला नाही. विशेष मुलांना विद्यालयात प्रवेश देण्याविषयीच्या बाबी हाताळण्यासाठीजिल्हा शिक्षण कार्यालयात नोडल अधिकारी नेमावा लागतो. फक्त चार राज्यांनीच असा अधिकारी नेमला आहे. केंद्राच्या या कायद्यांतर्गत नोंद होणारे खटले चालावेत म्हणून 58 टक्के राज्यांनी विशेष न्यायालये अधिसूचित केलेली नाहीत. कायद्याने बंधनकारक असले तरी, 87.5 टक्के राज्यांनी स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर्स नेमलेले नाहीत. सरकारी व सार्वजनिक क्षेत्रत रोजगार संधींमध्ये अपंग व्यक्तींना 3 टक्क्यांवरून 4 टक्क्यांर्पयत राखीवता वाढावी म्हणून 54.2 टक्के राज्यांनी काहीच तरतूद केलेली नाही. सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये अपंग व्यक्तींना अर्थसाह्य वाढविण्यासाठी पाऊले उचलण्याचे काम फक्त एकाच राज्याने केले आहे. 

सर्वेक्षणाअंती स्कोअर कार्ड तयार केले गेले आहे. मध्य प्रदेश व ओडिशाला 19 पैकी सर्वात जास्त म्हणजे प्रत्येकी 12 गुण मिळाले आहेत. त्यानंतर मेघालयाचा क्रमांक लागतो. मेघालयाला 11 गुण प्राप्त झाले. हिमाचल प्रदेशला 9 तर तामिळनाडूला 8 गुण प्राप्त  झाले. गोव्याला फक्त 4 गुण मिळाले आहेत. म्हणजेच 19 पैकी फक्त 21.1 टक्के गुण गोव्याच्या वाटय़ाला आले आहेत. 

टॅग्स :goaगोवा