शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

लताजींच्या ध्यासाने माझा आवाज मधुर बनला, अनुराधा पौडवाल यांचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 10:02 PM

माझा मूळ आवाज हा इतका गोड नव्हता. परंतु बालपणी एकदा लता मंगेशकर यांचे स्टुडिओमध्ये चाललेले रेकॉर्डिंग ऐकले व लतादीदींचा आवाज माझ्या मना काळजावर कोरला गेला.

पणजी: माझा मूळ आवाज हा इतका गोड नव्हता. परंतु बालपणी एकदा लता मंगेशकर यांचे स्टुडिओमध्ये चाललेले रेकॉर्डिंग ऐकले व लतादीदींचा आवाज माझ्या मना काळजावर कोरला गेला. त्या क्षणापासून सतत त्यांच्याच आवाजाचा ध्यास घेतला आणि चमत्कार व्हावा तसा माझा आवाज गोड झाला. हे उद्गार आहेत, विख्यात पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचे. त्यांच्या गोव्या भेटीदरम्यान कला अकादमीत घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.स्वस्तिक व कला अकादमीतर्फे आयोजित केलेल्या हितगूज कार्यक्रमात प्रा. संगीता अभ्यंकर यांनी पौडवाल यांच्या घेतलेल्या प्रकट मुलाखतीत पौडवाल यांनी आपल्या संगीतमय जीवनातील ब-याच गोष्टी उघड केल्या. त्या म्हणाल्या एखाद्या गोष्टीचा जर मनापासून ध्यास घेतला तर ती गोष्ट प्रत्यक्षात उतरते, याचा मला प्रत्यय आला आहे. चौथी इयत्तेत असताना लताजींचा आवाज स्टुडिओत ऐकला आणि त्या आवाजाची कायम मोहिनी माझ्यावर पडली. मलाही तसाच आवाज पाहिजे यासाठी ध्यास धरला होता. त्यातच मी न्युमोनियामुळे ४० दिवसांहून अधिक काळ आजारी पडले होते. त्याकाळात लताजींच्या आवाजातील भगवद्गीता आणि त्यांची गाणी कायम ऐकत राहिले. त्यांचा आवाज ऐकत आजारातून बरीही झाले तेव्हा चमत्कारच व्हावा तसा माझा आवाजही पूर्वीचा राहिला नव्हता. अगधी लतादितींसारखा हुबेहूब नसला तरी खूपच जवळ गेल्याचे जाणवत होते.बहुतेक गुणवान मुली या लग्नापूर्वी गाण्यात खूप नाव कमावतात आणि लग्न झाल्यानंतर गाणे कुठे तरी हरवून जाते. आपले मात्र एकदम उलट झाल्याचे पौडवाल यांनी सांगितले. लग्नापूर्वी केवळ आवड होती म्हणून गुणगुणत होते. कार्यक्रम, रेकॉर्डिंग वगैरे काहीच नव्हते. लग्न होऊन एक मुलगी झाल्यानंतर स्टुडिओत गाणे झाले आणि नंतर पार्श्वगायिकाही झाली, असे त्या म्हणाल्या. गायनाची आवड होतीच. पती अरुण पौडवाल हे संगीत इंडस्ट्रीमध्ये होतेच. परंतु वशिला लावून मला इंडस्ट्रीत नेण्याच्या विरोधात ते होते. माझे सासरे आपल्या ओळखीचा उपयोग करून गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमात माझे गायन होईल, याची व्यवस्था करीत होते. अशाच एका कार्यक्रमात मला मानधन म्हणून ३०० रुपये मिळाले होते. त्या ३०० रुपयांची गोडी इतकी अवीट होती की त्याची सर आताच्या लाखो रुपयांना नाही, असे त्या म्हणाल्या.युवक-युवतींना संदेश देताना त्यांनी यशाचे शिखर हे आपण ठरवायचे असते, असे सांगितले. अमुक एका व्यक्तीने अमुक उंचीपर्यंत मजल मारली म्हणून आपल्यालाही तितकीच मारावी लागेल हा विचार चुकीचा आहे. ती त्यापेक्षा अधिक वरही असू शकते किंवा जरा खालीही असू शकते. हे लक्ष्य आपण स्वत: ठेवावे आणि मुख्य म्हणजे ते समाधान देणारे असावे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Anuradha Paudwalअनुराधा पौडवाल