कॅसलरॉक ते कारांजाळे रेल्वेमार्गाच्या दरम्यान दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:24 IST2020-08-05T21:24:22+5:302020-08-05T21:24:37+5:30
दरड कोसळून रेल्वे रुळावर आलेले मातीचे ढीग व भोठे दगड हटवून दुपारी रेल्वे वाहतूकीसाठी मार्ग पुन्हा सुरळीत करण्यात आला

कॅसलरॉक ते कारांजाळे रेल्वेमार्गाच्या दरम्यान दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूकीस अडथळा
वास्को - पहाटे पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या वेळी कॅसलरॉक ते कारांजाळे अशा रेल्वे मार्गाच्या दरम्यान डोंगराळ भागातून दरड कोसळून रेल्वे रुळावर आल्याने या मार्गावर रेल्वे वाहतूकीसाठी अडथळा निर्माण झाला. दिल्ली येथून गोव्याच्या मडगाव रेल्वे स्थानकावर येणारी प्रवासी रेल्वे दरड कोसळण्याच्या घटने वेळी कॅसलरॉक रेल्वे स्थानक पार करून पुढे पोचली होती, मात्र दरडीची माती तसेच दगड रेल्वे रुळावर आल्याने या रेल्वेला पुढे जाण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण झाला. ही रेल्वे नंतर पुन्हा कर्नाटक, कॅसलरॉक रेल्वे स्थानकावर नेऊन यातील प्रवाशांच्या जेवण - खाण्याची व्यवस्था करून नंतर पाच बसेस करून त्यांना मडगावला पाठवण्यात आल्याची माहीती हुबळी रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रणेश के एन यांच्याकडून प्राप्त झाली.
बुधवारी पहाटे ५.४० च्या सुमारास सदर घटना घडली. कर्नाटक येथील कॅसलरॉक रेल्वे स्थानक ते गोव्याच्या कारांजाळे रेल्वे स्थानक या मार्गावरील डोंगराळ भागातून दरड कोसळून माती तसेच मोठे दगड रेल्वे रुळावर आल्याने हा मार्ग याकाळात रेल्वे प्रवासासाठी ठप्प झाला. सदर घटना घडण्याच्या वेळीच निझामुद्दीन - दिल्ली येथून गोव्याच्या मडगाव रेल्वे स्थानकावर येणारी (ट्रेन क्र ०२७८०) रेल्वे कॅसलरॉक रेल्वे स्थानक पार करून पुढे पोचली होती. दरड कोसळून यामार्गावरील रेल्वे रुळावर मातीचे ढीग तसेच मोठे मोठे दगड आल्याने पुढे प्रवास करण्याकरिता सदर रेल्वेसमोर मोठा अडथळा निर्माण झाला होता. या घटनेबाबत अधिक माहीती घेण्यासाठी दक्षिण पच्छीम रेल्वेच्या हुबळी विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रणेश के एन यांना संपर्क केला असता दिल्लीहून गोव्याला येणाºया रेल्वेला दरड कोसळल्याने प्रवास करण्याकरिता अडथळा निर्माण झाल्या व्यतिरिक्त अन्य कुठलाच अनुचित प्रकार घडला नसल्याचे त्यांनी कळविले. या घटनेनंतर दिल्लीहून गोव्याला येणारी सदर रेल्वे पुन्हा कॅसलरॉक रेल्वे स्थानकावर नेण्यात आली अशी माहीती प्रणेश यांनी दिली. तसेच या रेल्वेतून प्रवास करणाºया प्रवाशांची खाण्याची - जेवणाची व्यवस्था करून नंतर त्यांना पाच खास बसेस करून कॅसलरॉक येथून मडगाव जाण्यासाठी दुपारी पाठवण्यात आले.
पहाटे ५.४० वाजता दरड कोसळून रेल्वे रुळावर मातीचे ढीग तसेच छोटे मोठे दगड आल्याने रेल्वे वाहतूकीला निर्माण झालेला अडथळा दूर करण्याच्या कामाला त्वरित सुरवात करण्यात आली. याकामासाठी येथे कामगारांना लावण्यात आल्यानंतर बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळावर आलेल्या मातीचे ढीग तसेच छोटे मोठे दगड हटवून सदर मार्ग पुन्हा एकदा रेल्वे वाहतूकीसाठी पूर्णपणे सुरळीत करण्यात आलेला असल्याची माहीती जनसंपर्क अधिकारी प्रणेश के एन यांनी शेवटी दिली.