पर्रीकरांपेक्षा मिळणार कुंकळ्येकरांना मताधिक्य!

By Admin | Updated: February 13, 2015 01:14 IST2015-02-13T01:12:08+5:302015-02-13T01:14:06+5:30

पणजी : दिल्लीतील निकालांचा पणजी पोटनिवडणुकीत भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट सिद्धार्थ कुंकळ्येकर

Kumkalekar votes get more than Parrikar! | पर्रीकरांपेक्षा मिळणार कुंकळ्येकरांना मताधिक्य!

पर्रीकरांपेक्षा मिळणार कुंकळ्येकरांना मताधिक्य!

पणजी : दिल्लीतील निकालांचा पणजी पोटनिवडणुकीत भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट सिद्धार्थ कुंकळ्येकर हे पर्रीकर यांनी २0१२च्या निवडणुकीत मिळविलेल्या मतांपेक्षा किमान एक हजार अधिक मते मिळवून विजयी होतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केला.
पर्रीकरांच्या कारकिर्दीतच पणजीचा विकास झालेला आहे, असा दावा करून तेंडुलकर यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना तेंडुलकर म्हणाले की, लुईझिन सात-आठ वर्षे गोव्यात नव्हते. त्यामुळे येथे काय झाले आणि नाही याबद्दल त्यांनी बोलू नये. पणजीतील मतदार सुशिक्षित आहेत, म्हणूनच त्यांनी भाजपला सलग पाचवेळा ही
जागा दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Kumkalekar votes get more than Parrikar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.