गव्याने भोसकल्याने एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 02:50 IST2017-03-31T02:46:27+5:302017-03-31T02:50:50+5:30

धारबांदोडा : शिवडे-धारबांदोडा येथील येनू पांडुरंग सोलयेकर (५५) यांचा गव्याने भोसकल्यामुळे मृत्यू झाला. सोलयेकर हे आपल्या काजू

A killer stabbed one by one | गव्याने भोसकल्याने एक ठार

गव्याने भोसकल्याने एक ठार

धारबांदोडा : शिवडे-धारबांदोडा येथील येनू पांडुरंग सोलयेकर (५५) यांचा गव्याने भोसकल्यामुळे मृत्यू झाला. सोलयेकर हे आपल्या काजू बागायतीत काजू गोळा करण्यासाठी गेले होते. बुधवारी दुपारी ही घटना घडली.
सोलयेकर हे बुधवारी दुपारी घरातून जेवण करून आपल्या काजू बागायतीत गेले होते. मात्र, रात्री ८ वाजेपर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने याबाबत गावकऱ्यांना माहिती दिल्यावर गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, काजू बागायतीत पोट फाटलेल्या अवस्थेतील सोलयेकर यांचा मृतदेह आढळून आला. तसेच गव्याचा पाय छातीवर पडल्याने बरगड्याही मोडल्या होत्या. त्यामुळे गव्याने भोसकल्यानेच हा मृत्यू झाला असण्याची शक्यता (पान कश् वर)

Web Title: A killer stabbed one by one