शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

पणजी- दीड वर्षांनंतर गोमेकॉत झाले मूत्रपिंडरोपण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 10:18 PM

दीड वर्षांनंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा एकदा मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

पणजी: दीड वर्षांनंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा एकदा मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. आईकडून मुलाला मूत्रपिंड देण्याची ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्याची माहिती गोमेकॉकडून देण्यात आली. गोमेकॉत शनिवारी मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया युरोलोजी विभागाचे प्रमुख डॉ मधुमोहन प्रभुदेसाई आणि नेफ्रोलोजी विभागाचे प्रमुख डॉ जे पी तिवारी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे करण्यात आली. डिचोली येथील एका २२ वर्षीय युवकावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. युवकाचे मूत्रपिंड निकामी झाले असल्यामुळे त्याच्या आईकडून त्याला एक मूत्रपिंड देण्यात आले. गोमेकॉतील ही १५ वी मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रिया ठरली आहे. १५ ऑक्टोबर २०११ रोजी गोमेकॉत  पहिली मूत्रपिंड शस्त्रक्रिया करण्यात आली. एकूण गोमेकॉत मूत्रपिंडरोपणाच्या  १४ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. परंतु त्यानंतर नेफ्रोलोजी विभागाचे प्रमुख डॉ जे पी तिवारी हे गोमेकॉच्या सेवेतून दीर्घ रजेवर गेल्यामुळे हा विभागच अपंग झाला होता. नेफ्रोलोजी विभाग सक्रिय नसेल तर मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत, कारण मूत्रपिंड शस्त्रक्रियेनंतर ते मूत्रपिंड सक्रीय होईपर्यंत निगा राखण्याची मोठी जबाबदारी ही नेफ्रोलोजी विभागाची असते. त्यामुळे मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया पूर्णपणे थांबविण्यात आल्या होत्या. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या प्रयत्नाने नंतर डॉ तिवारी यांना पुन्हा गोमेकॉत आणण्यात यश मिळाल्यानंतर मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रिया विभाग पुन्हा सक्रिय करण्यात आला. शनिवारी एक शस्त्रक्रिया झाली आणि रविवारीही एक शस्त्रक्रिया होणार आहे. रविवारच्या शस्त्रक्रियेसाठीही आईकडून मुलाला मूत्रपिंड दान दिले जाणार आहे. बॉम्बे इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने गोमेकॉतील मूत्रपिंड शस्त्रक्रिया विभाग सुरू आहे. शनिवारी १५ वी शस्त्रक्रियाही इन्स्टिट्युटचे ज्येष्ठ युरोलोजिस्ट आणि मूत्रपिंड रोपण तज्ज्ञ डॉ उमेश ओझा आणि डॉ  सदानंद थत्ते यांच्या उपस्थितीत झाली. डॉ ओझा आणि डॉ थत्ते हे डॉ मधुमोहन यांचे शिक्षकही आहेत.