मूळ स्थानी होणार खाप्रेश्वर मंदिरचे बांधकाम: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:29 IST2025-06-10T10:29:14+5:302025-06-10T10:29:50+5:30

पर्वरीतील मंदिराच्या बांधकामाची केली पाहणी, काही लोकांकडून प्रकरणाचा बाऊ

khapreshwar temple will be constructed at its original location said cm pramod sawant | मूळ स्थानी होणार खाप्रेश्वर मंदिरचे बांधकाम: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मूळ स्थानी होणार खाप्रेश्वर मंदिरचे बांधकाम: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : खाप्रेश्वर देवाच्या मूळ स्थानी आम्ही बांधकाम करण्याचे यापूर्वी आश्वासन दिले असून आता तेथील बिल्डरने जी काही जागा दिली आहे तेथे मंदिराचे बांधकाम करू. शिवाय येथील महामार्गालगतच्या ठिकाणी मंदिराचे बांधकाम सरकारतर्फे करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

खाप्रेश्वर देवाच्या दोन्ही ठिकाणी भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंत्री रोहन खंवटे, सुकुर सरपंच सोनिया पेडणेकर, उपसरपंच माया केणी, पंच सदस्य गौरी वळवईकर, राजन पार्सेकर, संबंधित खात्यातील अधिकारी, देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मंत्री रोहन खंवटे यांनी खाप्रेश्वर देवस्थानच्या एकूण मागील घटनांवर बोलताना पंचायत क्षेत्राबाहेरील लोकांनी देवस्थानच्या प्रकरणाचा बाऊ केला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यामध्ये लक्ष घालून ग्रामस्थांची देवस्थानसंबंधी मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. क्षेत्राबाहेरील लोकांनी देवस्थानच्या प्रकरणाचा बाऊ केला. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यामध्ये लक्ष घालून ग्रामस्थांची देवस्थानसंबंधी मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले.

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव खाप्रेश्वर मंदिराच्या बांधकामासंदर्भात रविवारी मंत्री खंवटे यांनी पंच सदस्य आणि देवस्थान समितीसह पाहणी केली होती. सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट देऊन देवस्थान बांधकाम करून देऊ, असे आश्वासन दिले. तसेच भाविकांच्या भावना आम्ही कधीही दुखवणार नाही. काही जणांनी या प्रकरणाबाबत राजकारण केले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आम्ही श्री देव खाप्रेश्वर मंदिराचे काम करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

राज्यात देवाबद्दल राजकारण

खाप्रेश्वर देवाबद्दल राज्यात मोठे राजकारण करण्यात आले. आम्ही देव, देश, धर्म आणि लोकांसाठी राजकारण करीत आलो आहोत. मंत्री रोहन खंवटे, पंचायत मंडळ यांनी कधीच राजकारण केले नाही आणि करणारही नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
 

Web Title: khapreshwar temple will be constructed at its original location said cm pramod sawant