‘अरविंद केजरीवाल वाद लावण्यात पटाईत’; प्रमोद सावंत यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 06:54 IST2020-11-13T02:09:42+5:302020-11-13T06:54:29+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यातील कलगीतुरा शिगेला पोहोचला आहे.

‘अरविंद केजरीवाल वाद लावण्यात पटाईत’; प्रमोद सावंत यांची टीका
पणजी : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यातील कलगीतुरा शिगेला पोहोचला आहे. दोघांमध्ये ट्विटर युद्ध चालू असून केंद्र सरकार गोव्यावर जबरदस्तीने प्रकल्प लादत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे, तर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वाद लावण्यात केजरीवाल पटाईत असल्याची टीका सावंत यांनी केली आहे.
बुधवारी केजरीवाल यांना उत्तर देताना सावंत यांनी असा सल्ला दिला होता की, ‘केजरीवाल यांनी आधी दिल्लीतील प्रदूषण सांभाळावे आणि नंतरच गोव्याबद्दल बोलावे.’ केजरीवाल यांनीही या ट्वीटला उत्तर देताना ‘मला दिल्लीबरोबरच गोवाही प्रिय आहे. दिल्ली आणि गोव्यातील प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न
करूया.