शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी काम करत रहा, प्रतापसिंह राणेंचा झेडपी सदस्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 13:29 IST

Goa News : सत्तरी तालुक्यातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या झेडपी सदस्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांची मंगळवारी भेट घेतली. सत्तरीच्या विकासासाठी काम करत रहावे असा सल्ला राणे यांनी या भेटीवेळी झेडपी सदस्यांना दिला.

पणजी - सत्तरी तालुक्यातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या झेडपी सदस्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांची मंगळवारी भेट घेतली. सत्तरीच्या विकासासाठी काम करत रहावे असा सल्ला राणे यांनी या भेटीवेळी झेडपी सदस्यांना दिला.जिल्हा पंचायतींच्या नगरगाव, केरी, होंडा या मतदारसंघातून काँग्रेसचा पराभव करत भाजपचे सदस्य निवडून आले. राज्यातील भाजप सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेल्या विश्वजित राणे यांनी या सदस्यांच्या प्रचाराचे नेतृत्व केले होते. पर्ये विधानसभा मतदारसंघात जे झेडपी मतदारसंघ येतात तिथेही प्रथमच भाजपचे झेडपी निवडून आले. सत्तरी व उसगाव गांजे अशा भागातील चारही झेडपी सदस्य मोठी आघाडी मिळवून विजयी झाले. या सदस्यांनी विश्वजित यांच्यासोबत मंगळवारी माजी मुख्यमंत्री राणे यांची भेट घेतली. कुळण येथील राणे यांच्या खासगी निवासस्थानी जाऊन हे सदस्य राणे यांना भेटले.आपण व झेडपी सदस्यांनीही आपले वडिल प्रतापसिंग राणे यांचे आशीर्वाद घेतले. कारण राणे हे सत्तरीचे मोठे नेते आहेत. नव्यानेच निवडून आलेल्या झेडपी सदस्यांनी झेडपी मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत रहावे असा सल्ला राणे यांनी सर्वांना दिल्याचे मंत्री विश्वजित यांनी पत्रकारांना सांगितले.देवयानी गावस, सगुण वाडकर, राजश्री काळे व उमाकांत गावडे हे चार झेडपी सदस्य सत्तरी तालुका व उसगाव भागातून निवडून आले आहेत. उत्तर गोव्यात सत्तरी हा एकमेव तालुका असा ठरला जिथे भाजपचा एकही उमेदवार झेडपी निवडणुकीत पराभूत झाला नाही व काँग्रेसचा एकही उमेदवार जिंकला नाही. उसगाव गांजे झेडपी मतदारसंघातून उमाकांत गावडे हे ४,५३४ मते घेऊन विजयी झाले. होंडा झेडपी मतदारसंघातून सगुण वाडकर हे ५,३५९ मते मिळवून विजयी झाले. केरीमधून देवयानी गावस यांनी ६ हजार ८०२ मते मिळवली. नगरगाव झेडपी मतदारसंघातून राजश्री काळे यांनी ६ हजार ६५२ मते प्राप्त करत विजय प्राप्त केला. मंत्री विश्वजित हे २०१७ सालापासून भाजपचे आमदार व मंत्री आहेत.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस