कवळे शांतादुर्गा देवस्थानचा कोट्यवधींचा ऐवज गायब

By Admin | Updated: July 3, 2014 01:18 IST2014-07-03T01:15:27+5:302014-07-03T01:18:08+5:30

फोंडा : कवळे येथील प्रसिध्द श्री शांतादुर्गा देवस्थानच्या विद्यमान कार्यकारिणी समितीने देवस्थानच्या मालमत्तेतून कोट्यवधी रुपयांचा ऐवज गायब झाल्याची तक्रार फोंडा पोलिसांत दिली आहे.

Kavale Shantadurga Devasthanas crores of treasures missing | कवळे शांतादुर्गा देवस्थानचा कोट्यवधींचा ऐवज गायब

कवळे शांतादुर्गा देवस्थानचा कोट्यवधींचा ऐवज गायब

फोंडा : कवळे येथील प्रसिध्द श्री शांतादुर्गा देवस्थानच्या विद्यमान कार्यकारिणी समितीने देवस्थानच्या मालमत्तेतून कोट्यवधी रुपयांचा ऐवज गायब झाल्याची तक्रार फोंडा पोलिसांत दिली आहे.
याबाबत फोंड्याचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणी गेल्या एप्रिल महिन्यात देवस्थान समितीने निवेदन दिल्याचे व या प्रकरणाची चौकशी फोंड्याचे मामलेदार अमोल गावकर करीत असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांना एकूण किती ऐवज चोरीला गेला आहे, याचा तपशील उपलब्ध झालेला नसून मामलेदार गावकर यांच्या चौकशी अहवालानंतरच सत्य समोर येणार असल्याचे ते म्हणाले.
पोलीस सूत्रांनुसार हे तक्रारवजा निवेदन गेल्या एप्रिल महिन्यात देण्यात आले होते. विद्यमान कार्यकारिणीने १ एप्रिल रोजी मावळत्या समितीकडून ताबा तसेच चाव्या स्वीकारल्या होत्या. त्यानंतर नूतन समितीला हा ऐवज गायब असल्याचे आढळून आले. मात्र, मावळत्या समितीकडे चौकशी केली असता २0१२ सालच्या समितीकडून ताबा स्वीकारताना जो ऐवज होता, त्याच परिस्थितीत तो नवीन समितीकडे दिला गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. पोलीस सूत्रांनी विद्यमान कार्यकारिणीने ऐवज पडताळून न पाहता ताबा कसा काय स्वीकारला याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.
फोंड्याचे मामलेदार अमोल गावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या देवस्थानच्या मालमत्तेतील किमती ऐवज गायब झाल्याबाबत एफआयआर नोंद करण्यात आला असून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. विद्यमान कार्यकारिणी समितीने अमूकच व्यक्ती किंवा समितीवर ठपका ठेवलेला नाही. मात्र, ऐवज गायब झाल्याची तक्रार आल्याचे ते म्हणाले.
(प्रतिनिधी)

Web Title: Kavale Shantadurga Devasthanas crores of treasures missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.