कदंब बस अपघातातील जखमींना नागरिकांची मदत
By Admin | Updated: June 17, 2014 01:47 IST2014-06-17T01:45:52+5:302014-06-17T01:47:04+5:30
कोपार्डे (जि. कोल्हापूर) : कोपार्डे-आडूरनजीकच्या वळणावर कदंब बसने झाडाला दिलेली धडक इतकी जोरात होती की, स्फोट झाल्यासारखा

कदंब बस अपघातातील जखमींना नागरिकांची मदत
कोपार्डे (जि. कोल्हापूर) : कोपार्डे-आडूरनजीकच्या वळणावर कदंब बसने झाडाला दिलेली धडक इतकी जोरात होती की, स्फोट झाल्यासारखा आवाज होऊन गाडी पुढील व मागील बाजूने दोन झाडांवर धडकली. या वेळी चालक वाहकाच्या सीटवर येऊन पडला होता. त्याच्यासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले.
जखमी प्रवाशांच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेतल्या. जखमींना रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये उपचारासाठी पाठवून दिले. गंभीर जखमींवर प्राथमोपचार करून त्यांना खासगी रुग्णालयात हलविले. ग्रामस्थांनी प्रवाशांचे अस्ताव्यस्त पडलेले साहित्य एकत्र करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, अपघाताची माहिती करवीर पोलिसांना देण्यात आली. पोलीस भरतीमध्ये व्यग्र असलेले अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस उपअधीक्षक वैशाली माने, पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघात कसा झाला, याची माहिती घेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांशी त्यांनी संपर्क साधला.
मृत बसचालक मेल्वीन फर्नांडिस यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाउ असा परिवार आहे. दहा वर्षे त्यांनी रोजंदारीवर चालक म्हणून काम केले. सहा वर्षांपूर्वी त्यांना कायम केले होते. आले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. जखमींत गोव्याचा एकही प्रवासी नाही. (वार्ताहर)