जावेद साडेकर याचा मृतदेह सापडला, मांडवी पुलावरील अपघातातील बळी
By वासुदेव.पागी | Updated: February 24, 2024 16:46 IST2024-02-24T16:45:25+5:302024-02-24T16:46:42+5:30
मांडवी पुलावर रेन्ट अ कॅब कारने ठोकरल्याने जावेद सडेकर हा मांडवी नदीत पडला होता.

जावेद साडेकर याचा मृतदेह सापडला, मांडवी पुलावरील अपघातातील बळी
पणजी: बेफाम रेंट असा अर् कॅबची ठोकर बसून मांडवी नदीत फेकला गेलेला जावेद सडेकर (३६) याचा मृतदेह तब्बल 36 तासांच्या शुद्धकार्यानंतर सापडला.
मांडवी पुलावर रेन्ट अ कॅब कारने ठोकरल्याने जावेद सडेकर हा मांडवी नदीत पडला होता. गेल्या ३६ तासांहून जास्त काळ प्रशासकीय यंत्रणा त्याचा शोध घेत होती. रेन्ट अ कारचालक अंकित त्रिपाठी पणजीहून पर्वरीला जात होता. जुन्या मांडवी पुलावर पोहोचताच त्याने पुढे जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या जावेदला जोरदार धडक दिली होती. त्यामुळे जावेद उंच फेकला जाऊन नदीत पडला होता. या अपघाती मृत्यूप्रकरणी रेंट अ कार चालक अंकित त्रिपाठी याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे.
दरम्यान वैद्यकीय चाचणीतून निघालेल्या निष्कर्षाप्रमाणे रेन्ट अ कार चालक अंकित त्रिपाठी हा दारू पिऊन गाडी चालवत होता. जावेद हा मूळचा मडगाव येथील असून तो आपल्या कुटुंबासमवेत नास्नोळा येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.