इफ्फीच्या कालावधीत पणजीत जमावबंदी, जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी
By पूजा प्रभूगावकर | Updated: November 22, 2023 13:08 IST2023-11-22T13:08:01+5:302023-11-22T13:08:39+5:30
दरवर्षी सरकार इफ्फी काळात ही जमावबंदी लागू करते.

इफ्फीच्या कालावधीत पणजीत जमावबंदी, जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी
पणजी: पणजीत सुरु असलेल्या ५४ व्या इफ्फीनिमित्त पणजी व आगशी परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू केले असून याबाबतचा आदेश त्यांनी जारी केला आहे.
सदर जमावबंदी २० ते २८ या काळात लागू असेल. या कळात मिरवणुका, मोर्चा, शस्त्र हाताळणी, मोठया संख्येने लोकांनी एकत्र जमणे यावर बंदी घालण्यात आली आहे. इफ्फीत देश विदेशातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व महोत्सव सुरळीतपणे पार पडावे, यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला असून त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे त्यात नमूद केले आहे.
दरवर्षी सरकार इफ्फी काळात ही जमावबंदी लागू करते.