१७ रोजी दक्षिण गोव्यात अनियमित पाणी पुरवठा
By पूजा प्रभूगावकर | Updated: March 15, 2024 13:59 IST2024-03-15T13:58:50+5:302024-03-15T13:59:38+5:30
नियमितप पाणी पुरवठा तसेच वीज खंडितचा परिणाम हा सांगे, केपे, सासष्टी, मुरगाव तालुक्यांसह शिरोडा व सांतआंद्रे मतदारसंघाच्या काही भागांवरही होईल.

१७ रोजी दक्षिण गोव्यात अनियमित पाणी पुरवठा
पणजी: दक्षिण गोव्यात साळावली येथून रविवार १७ मार्च रोजी अनियमित पाणी पुरवठा होईल असे सार्वजनिक बांधकाम खात्याने कळवले आहे.
दक्षिण गाेव्यात १७ मार्च रोजी सकाळी ७ ते दुपारी १ वाजे दरम्यान वीज खात्याकडून पूर्वनियोजित कामांसाठी वीज पुरवठा खंडित केला जाईल. त्याचा परिणाम दक्षिण गोव्याला साळावली धरणातून होणाऱ्या १६० एमएलडी जल शुध्दीकरण प्रकल्पातून पाणी पुरवठा होईल. या कामा व्यतिरिक्त घोगळ मडगाव येथील १०० एमएलडी पाण्याच्या पाईपलाईनच्या देखभालीचेही काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे त्यादिवशी दक्षिण गोव्यात नियमित पाणी पुरवठा होईल.
नियमितप पाणी पुरवठा तसेच वीज खंडितचा परिणाम हा सांगे, केपे, सासष्टी, मुरगाव तालुक्यांसह शिरोडा व सांतआंद्रे मतदारसंघाच्या काही भागांवरही होईल. नागरिकांनी याची दखल घ्यावी असे सार्वजनिक बांधकाम खात्याने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.