आयपीएस सुनिल गर्गची उच्च न्यायालयात धाव, लाचखोरी प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 21:34 IST2018-01-20T21:34:19+5:302018-01-20T21:34:32+5:30
लाचखोरी प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचा आदेश पणजी विशेष न्यायालयाने दिल्यानंतर आयपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आव्हान दिले आहे.

आयपीएस सुनिल गर्गची उच्च न्यायालयात धाव, लाचखोरी प्रकरण
पणजी- लाचखोरी प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचा आदेश पणजी विशेष न्यायालयाने दिल्यानंतर आयपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आव्हान दिले आहे. एफआयआर नोंदविण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागण्याच्या प्रकरणात गर्ग कॅमºयात टीपले गेले होते.
विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर आपल्याविरुद्ध केव्हाही एसीबीकडून गुन्हा नोंदविला जाण्याची भिती असल्यामुळे त्यांनी खंडपीठात धाव घेतली आहे. या प्रकरणात त्यामुळे आता पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई होणर आहे. पहिल्या न्यायालयीन लढाईत निवाडा गर्ग यांच्या विरोधात गेला होता आणि राज्यात पहिल्यांदाच एका आयपीएस अधिकार्याविरुद्ध लाचखोरी प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचा आदेश देण्यात आला होता.
मुन्हालाल हलवाई नामक गृहस्थाने फोंडा पोलीस स्थानकात नोंदविलेली फसवणुकीची तक्रार गुन्हा म्हणून नोंदविण्यात आली नसल्यामुळे हलवाई यांनी तत्कालीन पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्याकडे मदतीची याचना केली होती. परंतु फोंडा पोलीसांना गुन्हा नोंदविण्याच्या सूचना देण्या ऐवजी गर्ग यांनी हलवाई यांच्याकडे त्यासाठी लाच मागितली असा हलवाई यांचा आरोप होता आणि ते सिद्ध करण्यासाठी त्याने व्हिडिओ फुटेजही सादर केली आहे. त्यात गर्ग यांना त्यांच्या आवाजासह टीपले गेले आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रारही नोंदविली होती आणि एसीबीच्या प्राथमिक तपासात या प्रकरणात भरपूर तथ्य असल्याचे आढळून आले होते. परंतु गुन्हा नोंदविण्यात न आल्यामुळे गर्ग यांनी न्यायालयात धाव घेतली होती. विशेष न्यायालयाच्या निवाड्याच्या रुपाने त्यांना फार मोठा दिलासा मिळाला होता.