मुंबईतील अटकेमुळे इंटरपोलच्या विश्वासार्हतेला धक्का

By Admin | Updated: January 18, 2015 01:41 IST2015-01-18T01:38:09+5:302015-01-18T01:41:14+5:30

--

Interpol's trustworthy push to Mumbai's arrest | मुंबईतील अटकेमुळे इंटरपोलच्या विश्वासार्हतेला धक्का

मुंबईतील अटकेमुळे इंटरपोलच्या विश्वासार्हतेला धक्का

पणजी : परदीपसिंग बिरिंग आणि जगदीप सैगल यांना वर्षभरानंतर अटक करण्यात आली असली, तरी या एकूणच घटनाक्रमाचा आढावा घेतला असता, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी व बिरिंग युकेला असल्याचे सांगणाऱ्या इंटरपोलच्या विश्वासार्हतेवरही संशयाचे ढग निर्माण झाले आहेत.
दोन्ही संशयितांपैकी बिरिंग हा युकेमध्ये आढळल्याची माहिती सीआयडीला इंटरपोलद्वारे मिळाली होती; परंतु संशयिताच्या वकिलाने शनिवारी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, दोन्हीही संशयित हे देशाबाहेर कधी गेलेच नव्हते. तसे प्रतिज्ञापत्रही संशयितांच्या वतीने त्यांचे वकील प्रदीप पालयेकर यांनी न्यायालयात सादर केले आहे. पासपोर्टवर विदेश प्रवासातील नोंदी सापडत असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींची जाणीव असतानाही संशयित पोकळ दावा करण्याची जोखीम उठविण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे बिरिंग हे युकेमध्ये सापडले या गोष्टीत किती तथ्य होते, ती माहिती चुकीची होती तर हा शोध कुणी, कसा आणि कशासाठी लावला, हे प्रश्न अनुत्तरित राहातात.

Web Title: Interpol's trustworthy push to Mumbai's arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.