बाबूश मोन्सेरात कडून जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी: नवीन इमारतीत हलविण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:44 IST2023-12-01T16:43:33+5:302023-12-01T16:44:35+5:30
नारायण गवस,पणजी: महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी शुक्रवारी पणजीतील उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी केली तसेच या कार्यालयाच्या व ...

बाबूश मोन्सेरात कडून जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी: नवीन इमारतीत हलविण्याचा सल्ला
नारायण गवस,पणजी: महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी शुक्रवारी पणजीतील उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी केली तसेच या कार्यालयाच्या व इमारतीच्या स्थितीची आढावा घेतला. हे कार्यालय सीएसआर निधीतून जीएसआयडीसीच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या इमारतीत हलविण्याचा सल्ला त्यांनी यावेळी कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिला.
मंत्री बाबू मोन्सेरात यांनी अचानक कार्यालयात जाऊन कामगारांच्या कामाच्या स्थितीचा आढावाही घेतला. इमारत जूनी असल्याने हे कार्यालय सुरक्षित इमारतीत हलविण्याचा सल्लाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
येत्या पावसाळ्यापूर्वी स्मार्ट सिटीचे काम पूर्ण :
यावेळी पत्रकारांनी मंत्री बाबूश मोन्सेरात यांना पणजीतील सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाविषयी विचारले असता. त्यांनी येत्या पावसाळ्यापूर्वेी पणजीतील स्मार्ट सिटीची सर्व कामे पूर्ण हाेणार आहे. सध्या विविध खात्याची परवानगी घ्यावी लागते त्यामुळे टप्प्या टप्प्याने काम करता येत नाही. त्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी खाेदकाम करावे लागते. तरी आम्ही पणजीतील लाेकांना खाेदकामाचा त्रास होऊ नये याची योग्य काळजी घेत आहोत. लवकरच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.
आमदार मायकल लोबाे यांनी कचरा व्यावस्थापन खाते कचऱ्याचे नियोजन करण्यास अपयशी ठरले असा अरोप केला असे सांगितल्यावर मंत्री बाबूश माेन्सेरात म्हणाले. कचरा व्यवस्थापन खाते चांगले काम करत आहे. आम्ही कचऱ्याचे याेग्य ते नियाेजन केेेले आहेत. आपल्याला कुणावरच काहीच बाेलायचे नाही. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, असे म्हणत आमदार मायकल लोबोवर बोलणे त्यांनी टाळले.