शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोद सावंत सरकारकडून गोव्यात भंडारी समाजावर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:13 IST

किरण कांदोळकर यांच्याकडून आरोप: समाजात एक प्रकारची अस्वस्थता

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असताना गोव्यात भाजप पक्षात भंडारी समाजाला जो मान होता तो आता नाहीसा झाला आहे . डॉ. प्रमोद सावंत सरकारने भंडारी समाजावर अन्याय केला आहे अशी तीव्र भावना समाजात तयार होऊ लागली आहे असे मत भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी व्यक्त केले आहे.

भंडारी समाजातील प्रभावी नेते असलेले कांदोळकर यांनी मंगळवारी गोवा फोरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळीच भाजपातून काँग्रेस आमदार रवी नाईक यांच्या दोन्ही पुत्राना भाजपात प्रवेश दिला जाईल हे वृत्त प्रसारित झाले. राजकीय विश्लेषक या दोन्ही घटनांची एकामेकाशी सांगड घालीत आहेत. कांदोळकर भंडारी मतपेटी आपल्याकडे ओढू शकतील अशी भीती भाजपला वाटू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर  कांदोळकर यांच्याशी संपर्क साधला असता, होय सध्या हा समाज भाजपात अस्वस्थ आहे आणि पुढच्या निवडणुकीत तो वेगळा विचार करू शकेल, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, 2012 साली मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात 4 भंडारी मंत्री होते. 2017 साली ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर या समाजातील तिघांना मंत्रिपद मिळाले, खरे तर आता पार्रिकर यांचेच सरकार डॉ. सावंत पुढे चालवीत आहेत तरीही या मंत्रिमंडळात केवळ एकाच भंडारी मंत्री आहे. पर्रिकर  असताना या समाजालाया पुरेसे प्रतिनिधीत्व त्यांच्या मंत्रिमंडळात मिळायचे आता ते मिळत नाही, यामुळेच हा समाज दुखवला गेला आहे , असे ते म्हणाले.

विजय सरदेसाई याना भेटण्यासाठी ते का गेले असे विचारले असता ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत गोव्यात प्रादेशिक पक्षांचे सरकारच चांगले प्रशासन देऊ शकते असा माझा ठाम विश्वास आहे. मी स्वतः माझा पक्ष काढू पाहत आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या पुढाऱ्यां मी सध्या भेटत आहे. यापूर्वी मी मगोचे  सुदिन ढवळीकर याना भेटलो होतो, लवकरच दयानंद नार्वेकर यांनाही भेटणार असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंत