अहमदाबादला जाणाऱ्या विमानाचे दाबोळी विमानतळावर इमरजन्सी लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 07:08 PM2019-07-15T19:08:48+5:302019-07-15T19:25:29+5:30

१८० प्रवाशांना गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून अहमदाबाद घेऊन जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

Indigo plane emergency landing dabolim airport | अहमदाबादला जाणाऱ्या विमानाचे दाबोळी विमानतळावर इमरजन्सी लँडिंग

अहमदाबादला जाणाऱ्या विमानाचे दाबोळी विमानतळावर इमरजन्सी लँडिंग

Next

वास्को - 180 प्रवाशांना गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून अहमदाबाद घेऊन जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या इंडिगो एअरलाइन्स विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने ह्या विमानाला सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा दाबोळी विमानतळावर ‘इमरजन्सी लँडिंग’ (आकस्मिक उतरवावे) करावे लागले. हे विमान रत्नागिरी, महाराष्ट्र क्षेत्रात पोचले असता विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड होत असल्याचे संकेत वैमानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित दाबोळी विमानतळावरील ‘एटीसी’ विभागाला संपर्क करून नंतर सदर विमान सुरक्षितरीत्या येथे उतरविले.

दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.15) संध्याकाळी 4 च्या सुमारास ही घटना घडली. 3.50 वाजता दाबोळी विमानतळावरून इंडिगो एअरलाइंन्स चे ‘6 इ 162’ विमान 180 प्रवाशांना घेऊन अहमदाबाद, गुजरात जाण्यासाठी रवाना झाले. विमान उड्डाणाच्या काळात रत्नागिरी भागात पोचले असता विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे संकेत वैमानिकाला मिळाले. विमानात निर्माण झालेल्या बिघाडामुळे यात असलेल्या 180 प्रवाशांना तसेच विमानातील कर्मचाऱ्यांना धोका निर्माण न व्हावा यासाठी वैमानिकाने त्वरित दाबोळी विमानतळावरील ‘एटीसी’ विभागाला याबाबत माहीती दिली. सदर विमानाला त्वरित पुन्हा दाबोळी विमानतळावर इमरजन्सी लँडिंग करावे लागणार असल्याची माहिती वैमानिकाने दिली. यानुसार दाबोळी विमानतळावर सर्व प्रकारच्या सुरक्षेची पावले घेऊन जर काही आपतकालीन घटना घडल्यास त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी व इतर सुरक्षा यंत्रणांनी त्वरित उड्डाणपट्टीच्या क्षेत्रात उपस्थिती लावून ते सज्ज झाले. सुरक्षेची पावले दाबोळी विमानतळावर घेतल्यानंतर वैमानिकाला हे विमान दाबोळी विमानतळावर इमरजेंन्सी उतरवण्यासाठी परवानगी दिली.

ह्या विमानाच्या वैमानिकाने नंतर रत्नागिरी भागातून त्वरित वळण घेतल्यानंतर 4.45 वाजता विमानाची दाबोळी विमानतळावर इमरजन्सी लँडिंग केली. सदर विमानातील प्रवासी तसेच कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी दिली. दरम्यान ह्या विमानाच्या इंजिनात काय तांत्रिक बिघाड झालेला आहे याबाबतची तपासणी इंडीगो विमानाच्या अभियंत्यांकडून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी उपलब्ध केली आहे. विमानात निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर हे विमान 180  प्रवाशांना घेऊन दाबोळी विमानतळावरून अहमदाबाद जाण्यासाठी रवाना होणार आहे.

Web Title: Indigo plane emergency landing dabolim airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.