सागरी आव्हानाचा सामना करण्यास भारतीय नौदल सज्ज - संरक्षणमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 11:49 IST2017-11-01T11:49:06+5:302017-11-01T11:49:35+5:30
सागरी आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सज्ज असल्याचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. गोव्यात नौदलाच्या विशेष सोहळ्यात त्या बोलत होत्या.

सागरी आव्हानाचा सामना करण्यास भारतीय नौदल सज्ज - संरक्षणमंत्री
पणजी - सागरी आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सज्ज असल्याचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. गोव्यात नौदलाच्या विशेष सोहळ्यात त्या बोलत होत्या. नौदलाच्या आयएनएस मांडवीतर्फे आयोजित सागरी परिषदेचे उद्घाटन सत्रात बोलताना त्यांनी विविध सागरी आव्हानांचा उल्लेख केला. सागरी हद्दीत प्रत्येक देश आपली ठाणी (आउटपोस्ट) उभारता आहेत. त्यामुळे खबरदारीची उपाय योजना ही करावीच लागते. दुसरे महत्त्वाचे आव्हान म्हणजे समुद्राच्या जवळ फार मोठ्या संख्येने असलेल्या लोकांचे सागरी धोक्यांपासून संरक्षणाचे. नैसर्गिक आपत्ती देशाला नव्या नाहीत. विशेष करून समुद्रापासून जवळ राहणाऱ्या लोकांना हा धोका अधिक असतो. सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्याची सज्जता नौदलाने ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले. सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या सागरमाला या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा उल्लेखही यावेळी त्यांनी केला.