कायदा व्यवस्था कोलमडल्याने हल्ल्यात वाढ; ॲड. शिराेडकर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 14:25 IST2024-03-05T14:25:36+5:302024-03-05T14:25:53+5:30
सरकारने याची गंभीर दखल घेतली नाही तर याचा फटका पर्यटन व्यवसायावर हाेणार आहे. असे ॲड. हृदयनाथ शिराेडकर आणि महेश म्हांबरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वेर्णा येथे रस्त्यावर एका रेंट अ कार चालक पर्यटकाला ६ युवकांनी केलेल्या बेदम मारहाणीचा त्यांनी निषेध केला.

कायदा व्यवस्था कोलमडल्याने हल्ल्यात वाढ; ॲड. शिराेडकर यांचा आरोप
नारायण गावस
पणजी: राज्यातील कायदा सुव्यवस्था कोलमडल्याने आज पर्यटकांवर तसेच स्थानिकांवर हल्ले हाेण्याच्या
घटना वाढत आहेत. सरकारने याची गंभीर दखल घेतली नाही तर याचा फटका पर्यटन व्यवसायावर हाेणार आहे. असे ॲड. हृदयनाथ शिराेडकर आणि महेश म्हांबरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वेर्णा येथे रस्त्यावर एका रेंट अ कार चालक पर्यटकाला ६ युवकांनी केलेल्या बेदम मारहाणीचा त्यांनी निषेध केला.
ॲड. हृदयनाथ शिराेडकर म्हणाले, आज कुणालाच कायद्याची भिती नसल्याने लहान लहान गोष्टींवर मारहाण भांडणे हाेत आहेत. कुणाला पाेलिसांची भिती नाही. कारण प्रत्येक गोष्टीत राजकारणी दखल घेत आहेत. या राजकारण्यांच्या दबावामुळे पाेलीसही काही करत नाही. आज जर राज्यातील पर्यटनाच्या संवर्धनासाठी याेग्य पॉलिसी लागू केली नाहीतर भविष्यात पर्यटन व्यावसाय पूर्णपणे काेलमडणार आहे. आणि याला जबाबदार हे सरकार असणार असेही ॲड. शिरोडकर म्हणाले.
ॲड शिरोडकर म्हणाले, आज राज्यात वाढते जुगार कॅसिनो यामुळे काही पर्यटक यासाठी येत असतात. त्यामुळे गावा हे जुगाराचा अड्डा होत आहे. सरकारकडून कॅसिनाेमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात.
त्यांच्यावर कडक कारवाई करा: महेश म्हांबरे
त्या रेंट अ कारवाल्या पर्यटकाला मारहाण झाली आहे ते उच्च शिक्षित वकील आहेत. त्या कारमध्ये त्यांची गराेदर पत्नी व एक लहान मुलगी हाेती. त्या युवकांनी त्यांच्या कारच्या काचा फोडल्या त्यांना मारहाण केली काही जणांना अटक केली आहे. ते युवक एका मंत्र्याचे समर्थक असल्याचे कळाले आहे. पण असे जे कोणी कायदा हातात घेतात. त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहीजे. यात कुठल्याच मंत्र्यांनी हस्तक्षेप करु नये. आज जर पर्यटक राज्यात आले नाही तर पर्यटक व्यावसाय बंद पडणार आहे. अगोदर खाण व्यावसाय बंद पडला आहे. याची सरकारने दखल घ्यावी.