चौकशीस ‘पुढारी’चे असहकार्य
By Admin | Updated: November 3, 2015 02:15 IST2015-11-03T02:15:16+5:302015-11-03T02:15:26+5:30
पणजी : मटक्याचे क्रमांक प्रसिद्ध केल्याप्रकरणी चौकशीच्या बाबतीत दैनिक पुढारीने असहकार्याची भूमिका घेतल्याने पालिसांकडून मंगळवारी आणखी एक समन्स या

चौकशीस ‘पुढारी’चे असहकार्य
पणजी : मटक्याचे क्रमांक प्रसिद्ध केल्याप्रकरणी चौकशीच्या बाबतीत दैनिक पुढारीने असहकार्याची भूमिका घेतल्याने पालिसांकडून मंगळवारी आणखी एक समन्स या दैनिकाच्या गोव्यातील निवासी संपादकांना पाठविले जाणार आहे.
क्राईम ब्रँचमधील सूत्रांकडून ही माहिती मिळाली. नंबर छापण्यासाठी कोण देत होता, त्यासाठी किती पैसे घेतले जात
होते व पैसे कोण घेत होता, याविषयीची माहिती पोलिसांनी मागितली होती;
परंतु दैनिक पुढारीच्या व्यवस्थापनाने
या प्रश्नांना बगल दिली. आता नव्या समन्सच्या माध्यमातून ‘पुढारी’च्या व्यवस्थापनाला, तपासकामात योग्य
ते सहकार्य करण्याचे तसेच
मागितलेली माहिती द्यावी, असे
बजावण्यात येणार आहे.
मटका प्रकरणात दैनिक पुढारीबरोबरच दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ‘पुढारी’च्या व्यवस्थापनाने योग्य ती माहिती देण्यास टाळाटाळ चालविल्याने फौजदारी दंड संहितेच्या कलम ४१अंतर्गत निवासी संपादकांच्या नावे समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या एका तपास अधिकाऱ्याने दिली.
आरटीआय कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी भादंसंच्या कलम १०९, १२० (बी), (३४), गोवा-दमण-दीव जुगारविरोधी कायदा कलम ३, ४, ११ (२) १२ (१) (अ) अंतर्गत १२ आॅक्टोबर रोजी गुन्हे दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)