निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे गोव्यात, घेतली विजय सरदेसाईंची भेट

By वासुदेव.पागी | Updated: March 9, 2024 15:35 IST2024-03-09T15:35:48+5:302024-03-09T15:35:51+5:30

घाडीच्या भागीदारांशी चर्चा करणे हे कॉंग्रेसचे कामच आहे असे ते म्हणाले. 

In the wake of the elections Manikrao Thackeray met Vijay Sardesai in Goa | निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे गोव्यात, घेतली विजय सरदेसाईंची भेट

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे गोव्यात, घेतली विजय सरदेसाईंची भेट

पणजी: गोव्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर गोव्यात आलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आमदार विजय सरदेसाई यांची भेट घेतली. या भेटीविशयी ठाकरे यांनी सविस्तर माहिती दिली नाही. गोवा फॉरवर्ड पक्ष इंडिया आघाडीचा एक घटक आहे. आघाडीच्या भागीदारांशी चर्चा करणे हे कॉंग्रेसचे कामच आहे असे ते म्हणाले. 

सरदेसाई यांना या बैठकीविषयी विचारले असता ते म्हणाले की, उमेदवारांबाबत आपले काही बोलणे झाले नाही.  लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराबद्दल विचारले असता, सरदेसाई ते म्हणाले की, “मी निवडणूक लढवत नसल्याने मला यात पडायचे नाही.' दरम्यान  दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस्को सार्दीन  यांनीही शनिवारी ठाकरे यांच्याशी स्वतंत्र भेट घेतली.  

उमेदवार ठरलेत, घोषणा बाकी

पक्षाच्या स्क्रीनिंग समितीने उमेदवारांची निवड आधीच केली आहे. केवळ घोषणा करणे बाकी आहे. अंतिम घोषणा पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक झाल्यानंतरच केली जाईल असे ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: In the wake of the elections Manikrao Thackeray met Vijay Sardesai in Goa