शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! फोंडा तालुक्यात झालेल्या दोन अपघातात दोन ठार तर चार जखमी

By आप्पा बुवा | Updated: May 24, 2024 16:45 IST

शुक्रवारी दिवसभर फोंडा तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोघेजण ठार झाले आहेत.

अप्पा बुवा ,फोंडा: शुक्रवारी दिवसभर फोंडा तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोघेजण ठार झाले आहेत तर, एकूण चार जण जखमी होण्याची घटना घडली आहे.

पहिल्या अपघातात कुंडइ येथील श्रावण हरी नाईक हा 18 वर्षीय युवक आपल्या ड्युक्स या दुचाकीने कुर्टीच्या दिशेने जात होता.  सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार तो भरधाव वेगात गाडी चालवत होता. कुर्टी येथील सावित्री सभागृह नजीक असलेल्या बायपास रस्त्यावर त्याचा गाडीवरचा तोल गेला व त्याने एका विजेच्या खांबाला धडक दिली. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

पंचवाडी येथे झालेल्या दुसऱ्या एका अपघातात एक ठार तर चार जण जखमी झाले आहेत. एक टँकर सावर्डे येथून पाणी भरून फोंड्याच्या दिशेने जात होता. त्याचवेळी समोरून येणारा एका ट्रकची त्याला  धडक बसली. ट्रकची धडक बसताच ड्रायव्हरचा स्टेरिंग वरील ताबा गेल व वॉटर टँकर बाजूला गेला. त्याचवेळी पेडणे येथून एक टुरिस्ट टॅक्सी प्रवाशांना घेऊन सावर्डेचे दिशेने जात होती.

टँकरची धडक सुरुवातीला त्या टॅक्सीला बसली. टॅक्सीला धडक देऊन टँकर  दोन वेळा पलटी झाला. सदर अपघातात टँकरमध्ये बसलेला एका इसमाचा जागीच  मृत्यू झाला. तर ड्रायव्हर व क्लीनर हे जखमी झाले आहेत. ट्रक मधील जखमीना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे तर टुरिस्ट टॅक्सी मध्ये जखमी झालेल्या प्रवाशाना मडगाव येथील अस्पिसिओ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात