गोव्यात समुद्राच्या लाटात बसून दारु पिण्याचा मोह युवकाला नडला, पाण्यात बुडून मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Updated: June 5, 2024 11:49 IST2024-06-05T11:47:17+5:302024-06-05T11:49:08+5:30

नीरज नारायण पवार असे २५ वर्षीय मृताचे नाव आहे

In Goa, a young man succumbed to the temptation of drinking alcohol by sitting in the waves of the sea, and died by drowning | गोव्यात समुद्राच्या लाटात बसून दारु पिण्याचा मोह युवकाला नडला, पाण्यात बुडून मृत्यू

गोव्यात समुद्राच्या लाटात बसून दारु पिण्याचा मोह युवकाला नडला, पाण्यात बुडून मृत्यू

सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: समुद्राच्या उसळत्या लाटात बसून दारु पिण्याचे साहस गोव्यात एका युवकाच्या जीवावर बेतले. लाटाच्या प्रवाहात तो बुडाला व मरण पावला. निरज नारायण पवार (२५ ) असे त्याचे  नाव असून, सासष्टीतील वार्का किनाऱ्यावर वरील दुदैवी घटना रविवारी २ रात्रीच्या दरम्यान घटना घडली. मृतदेह नंतर सापडला.मयत मिनेझिसभाट सां जुझे दि अरियाल येथील रहिवाशी आहे. त्याला दारु पिण्याचे व्यसन जडले होते.

वार्का किनाऱ्यावर तो गेला होता. तेथे त्याने दारु प्यायली होती. दारुच्या नशेतच तो पाण्यात उतरला व तेथेही दारु प्यायला लागला. एवढयात जोरदार लाट आली. व त्याचा तोल ढळला. त्यामुळे तो पाण्यात पडला व बुडाला.
किनाऱ्यावर पोलिसांना मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासकामाला सुरुवात केली. त्याच्या मित्राकडे चौकशी केली असता, मृत्युमागील कारण उघड झाले. मृतदेह नंतर येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळान नेउन शवचिकित्सेनंतर मयताच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. उपनिरीक्षक वैभव शिरोडकर पुढील तपास करीत आहेत.

Web Title: In Goa, a young man succumbed to the temptation of drinking alcohol by sitting in the waves of the sea, and died by drowning

टॅग्स :goaगोवा