स्थलांतरितांमुळे गुन्हे वाढले; मुख्यमंत्री सावंत यांचे विधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2024 13:14 IST2024-11-20T13:14:01+5:302024-11-20T13:14:05+5:30

जनतेने सतर्क राहावे; पोलिसही दक्ष

immigrants increase crime in goa statement of cm pramod sawant | स्थलांतरितांमुळे गुन्हे वाढले; मुख्यमंत्री सावंत यांचे विधान

स्थलांतरितांमुळे गुन्हे वाढले; मुख्यमंत्री सावंत यांचे विधान

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी/डिचोली : गोव्यात परप्रांतीयांचे स्थलांतर वाढल्याने गुन्हे वाढले आहेत, असे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. फसवणूक करणाऱ्यांपासून गोव्यातील लोकांनी व व्यावसायिकांनी सावध राहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एका कार्यक्रमाच्यावेळी बोलताना म्हणाले की, 'राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे लोकांनी सावध राहायला हवे. आता राज्यातील सोनारही घोटाळेबाजांच्या रडारवर आहेत. लोकांनी सपर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय बैठकीत एकूण तयारीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, परिसरात संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तीवर करडी नजर असेल. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शवप्रदर्शन सोहळा समितीची बैठक झाली. वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, शवप्रदर्शन सोहळा सचिवालय समितीचे अध्यक्ष पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, सचिव संदीप जॅकीस याप्रसंगी उपस्थित होते.

पवित्र शवप्रदर्शनासाठी व्यवस्था

मुख्यमंत्री म्हणाले की, शवप्रदर्शनासाठीची ९८ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. 'तीर्थक्षेत्र ग्राम' हे यंदाचे विशेष आकर्षण असेल. २७ डिसेंबर रोजी विशेष 'लाईट व म्युझिक शो' होईल. भाविकांसाठी जुने गोवे येथून प्रत्येक शहरात जाण्यायेण्यासाठी खास बसगाड्यांची व्यवस्था केली जाईल.

मानवी तस्करीचाही प्रकार उघड

गोवा पोलिसांनी मानव तस्करीचा एक प्रकारही शोधून काढला आहे. त्याप्रकरणी कारवाईसुद्धा केलेली आहे. राज्यात नोकरी घोटाळा, मानवी तस्करी, तसेच सोन्याची लूट आदी अनेक घटना घडलेल्या आहेत. या सर्व बाबतीत राज्य सरकारने अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे. पोलिसांनीही योग्य ती कार्यवाही केलेली आहे. काही प्रकरणांच्या बाबतीत धडक कारवाई सुरू आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

१३०० पोलिसांचा कडक बंदोबस्त 

सेंट झेवियर शवप्रदर्शन सोहळ्याच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत आढावा घेतला. जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस यांच्या दिव्य शवप्रदर्शनासाठी एकूण ६०० वाहतूक पोलिस आणि ७०० इतर पोलिस कर्मचारी मिळून १३०० पोलिस बंदोबस्तासाठी नियुक्त केले जातील. सीसीटीव्हीद्वारे प्रत्येक हालचालीवर कडक नजर आहे.

कौशल्याद्वारे दर्जेदार निर्मिती करावी 

गोव्यातील सुवर्ण कारागिरांना विश्वकर्मा योजनेंतर्गत सहभागी केले आहे. त्यांनी आपले कौशल्य विकसित करून आधुनिक कौशल्य आत्मसात करताना दर्जेदार निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

 

Web Title: immigrants increase crime in goa statement of cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.