आयआयटी फर्मागुडीत

By Admin | Updated: February 10, 2015 01:45 IST2015-02-10T01:43:08+5:302015-02-10T01:45:27+5:30

पणजी : जूनपासून फर्मागुडी येथे आयआयटीचे वर्ग सुरू करावेत, अशी चर्चा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केंद्रीय

IIT Pharmagideet | आयआयटी फर्मागुडीत

आयआयटी फर्मागुडीत

पणजी : जूनपासून फर्मागुडी येथे आयआयटीचे वर्ग सुरू करावेत, अशी चर्चा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांना सोमवारी दिल्लीत त्यांच्याशी केली. धारगळ येथील जागा मात्र केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयास पसंत नाही.
फर्र्मागुडी येथील सरकारच्या अभियांत्रिकी महाविद्यालय प्रकल्पात असलेल्या जागेत आयआयटीची तात्पुरती व्यवस्था होणार आहे. नवी मोठी पर्र्यायी जागा मिळेपर्यंत तिथे आयआयटीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. आयआयटीसाठी स्वतंत्र प्रकल्प उभा करण्यासाठी सुमारे चारशे एकर जागा हवी आहे. राज्यात कुठच्या तालुक्यात अशी पर्यायी जागा मिळेल, याचा शोध सरकार घेत आहे, असे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पेडणे येथे आयआयटीचे तात्पुरते वर्ग सुरू करावेत, असा विचार होता; पण ती जागा कमी पडते. फर्र्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जागेत एनआयटी कार्यरत होती. एनआयटीचे स्थलांतर झाल्यानंतर ती जागा रिकामी झाली आहे. तिथे आयआयटीचे वर्ग भरतील. धारगळ येथे ९ लाख चौरस मीटर जागा उपलब्ध आहे. तरीही धारगळपासून चार-पाच किलोमीटरच्या परिघात आणखी जागा मिळत असेल तर ती केंद्र सरकारला हवी आहे. त्यादृष्टीनेही जागेचा शोध घेतला जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)

Web Title: IIT Pharmagideet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.