इफ्फीचा मुक्काम कायम गोव्यातच
By Admin | Updated: June 26, 2014 01:25 IST2014-06-26T01:21:42+5:302014-06-26T01:25:06+5:30
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) गोवा कायमस्वरूपी केंद्र म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

इफ्फीचा मुक्काम कायम गोव्यातच
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) गोवा कायमस्वरूपी केंद्र म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष दामोदर नाईक यांनी ही माहिती बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
दिल्ली येथे १0 जून रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाची बैठक झाली. त्यात इफ्फीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी इफ्फीसाठी गोवा कायमस्वरूपी स्थळ म्हणून जाहीर करण्यात आले. इफ्फीच्या वेळापत्रकांवर गोव्यात २0 ते ३0 नोव्हेंबर रोजी इफ्फीचे आयोजन ठरल्याचे पत्र गोवा मनोरंजन संस्थेला पाठविले आहे, असे नाईक यांनी सांगितले. (पान २ वर)