शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गोव्यात इफ्फीचा उद्या समारोप, अमिताभ बच्चन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 7:41 PM

गेल्या काही दिवसांपासून येथे सुरू झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) समारोप उद्या मंगळवारी सायंकाळी होत आहे. समारोपावेळी अभिनेते अमिताभ बच्चन यांना जीवनगौरव तथा पर्सनलिटी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मामित केले जाणार आहे.

पणजी : गेल्या काही दिवसांपासून येथे सुरू झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) समारोप उद्या मंगळवारी सायंकाळी होत आहे. समारोपावेळी अभिनेते अमिताभ बच्चन यांना जीवनगौरव तथा पर्सनलिटी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मामित केले जाणार आहे. अमिताभ बच्चन यांनी  हिंदी सिनेसृष्टीत दिलेल्या एकूण योगदानाचा गौरव हजारो सिनेरसिकांच्या साक्षीने केला जाणार आहे. पूर्ण बच्चन कुटुंबीय या सोहळ्य़ास उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

यावेळी इफ्फीसाठी सुमारे साडेसात हजार प्रतिनिधींची नोंद झाली आहे. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये सायंकाळी चार वाजता समारोप सोहळा होईल. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची त्यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. अभिनेता सलमान खान, कटरिना कैफ आदी कलाकार उपस्थित राहतील असे सांगण्यात आले. पण, आयोजकांनी अजून अधिकृतरित्या नावे जाहीर केलेली नाहीत.  गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक म्हणाले, की अमिताभ बच्चन येणार हे निश्चित आहे. इतरांची नावे निश्चित झालेली नाहीत.

गोव्यात गेला आठवडाभर इफ्फीचा माहोल राहिला. जगभरातील चित्रपटांचा आस्वाद सिनेरसिकांनी घेतला. इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणा म्हणून अभिनेता शाहरूख खान उपस्थित राहिला होता. याशिवाय श्रीदेवी, शाहिद कपूर आदींची उपस्थिती होती. नाना पाटेकर, अनुपम खेर, किरण शांताराम व अन्य अनेक हिंदी आणि मराठी कलाकारांनी इफ्फीत भाग घेतला. माईक पांडे व अन्य माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांनीही इफ्फीची शान वाढवली. मास्टर क्लासेस व गटवार चर्चेचे कार्यक्रम रंगले. तरुण निर्मात्यांसाठी सोमवारी तुम्ही तुमचा पुढील सिनेमा कसा तयार कराल या विषयावर गटश: चर्चा झाली. इफ्फीलाच जोडून चार दिवस फिल्म बाजारही पार पडला. तिथेही शेकडो इफ्फी प्रतिनिधी येऊन गेले. मास्टर क्लास, पॅनल चर्चा, इफ्फीच्या समारोपाची तयारी एनएफडीसी आणि गोवा मनोरंजन संस्थेने चालवली आहे. थिंकींग ऑफ हिम हा आज समारोपाचा सिनेमा असेल. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमकडे आज कडेकोट पोलिस बंदोबस्त असेल. त्याबाबतची रंगीत तालिमही झाली आहे.

दरम्यान, एस. दुर्गा हा बहुचर्चित चित्रपट येथील कला अकादमीमध्ये सोमवारी सायंकाळी ज्युरी सदस्यांसाठी दाखविण्यात आला. केरळच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही आयोजकांनी प्रारंभी थोडी टाळाटाळ केली. तथापि, आपण न्यायालयात अवमान याचिका सादर करणार असल्याचा इशारा एस. दुर्गाच्या निर्मात्याने दिल्यानंतर ज्युरींसाठी सिनेमा प्रदर्शित करण्यास आयोजक तयार झाले.

टॅग्स :IFFI Goa 2017इफ्फी गोवा 2017