शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

गोव्यात सेक्स टुरिझमच्या ओढीनं येत असाल तर फसवणूक निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 11:53 IST

गोव्यात अलिकडे पोलिसांनी देहविक्री व्यवसायाविरुद्ध आणि कॉल गर्ल गोव्याला पुरविणा-या दलालांविरुद्धही जोरदार कारवाई सुरू केल्यामुळे प्रथमच गोव्याच्या किनारपट्टी भागातील दलाल सतर्क झाले आहेत.

पणजी : गोव्यात अलिकडे पोलिसांनी देहविक्री व्यवसायाविरुद्ध आणि कॉल गर्ल गोव्याला पुरविणा-या दलालांविरुद्धही जोरदार कारवाई सुरू केल्यामुळे प्रथमच गोव्याच्या किनारपट्टी भागातील दलाल सतर्क झाले आहेत. दुस-याबाजूने बहुतांश आंबटशौकीन पर्यटकांची दलालांकडून फसवणूक केली जाऊ लागल्याने, असे पर्यटकदेखील सावध बनले आहेत. आपली फसवणूक तर होत नाही ना? हे डील करण्यापूर्वी आता पर्यटक नव्या पद्धतीने तपासून पाहू लागले आहेत. गोव्यात हमखास कॉल गर्ल मिळतात, असा चुकीचा समज मनात ठेवूनच अजूनही काही पर्यटक हे सेक्स टुरिझमच्या मोहाने गोव्यात येतात पण त्यांची अलिकडे फसवणूकच होऊ लागली आहे. अशा पर्यटकांच्या वाट्याला अपेक्षाभंगच येऊ लागली आहे.

बार्देश, तिसवाडी, पेडणो या तालुक्यांच्या किनारपट्टी भागांमध्ये अनेक मसाज पार्लर हे पोलिसांच्या रडारवर आहेत. काही मसाज पार्लरांचा वापर सेक्स टुरिझमसाठीच केला जातो व त्यामुळे पोलिसांनी अलिकडे वारंवार मसाज पार्लरांवर छापे टाकल्याचे दिसून येते. गोव्यात गेल्या सहा वर्षात एकूण 523 कॉल गर्ल्सची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. 50 पेक्षा जास्त दलालांना पोलिसांनी पकडले. 2014 साली 53, 2015 साली 84 तर 2016 साली 86 कॉल गर्ल्सची देहविक्री व्यवसायातून पोलिसांनी सुटका केली. मसाज पार्लरांवर छापे पडू लागल्यामुळे आता चांगले पर्यटक देखील मसाज पार्लरांना भेट देण्याचा धोका पत्करत नाहीत.

पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, महाराष्ट्र अशा भागांतून कॉल गर्ल्सना गोव्यात आणले जाते. पोलिसांनी सातत्याने अलिकडे किनारपट्टीत छापे टाकून दलालांची धरपकड चालवल्यामुळे आंबटशौकीन पर्यटक आणि दलालही आपले इप्सीत साध्य करण्यासाठी आधुनिक पद्धती शोधून काढू लागले आहेत. गोव्यातील काही लॉजीस व छोटी हॉटेल्स यांच्यावर पोलिसांचे लक्ष आहे. साध्या वेशातील पोलीस अशा हॉटेलांच्या परिसरात फिरत असतात. खोटे ग्राहक दलालांकडे पाठवून कॉल गर्ल पुरविण्यासाठी पोलीस सापळा रचतात ही पद्धत आता दलालांना पूर्णपणे कळलेली आहे. यामुळे दलाल आता आपल्याकडे कॉल गर्ल मागण्यासाठी आलेला पर्यटक म्हणजे पोलिसांनी पाठवलेला खोटा ग्राहक तर नव्हे ना याची तपासणी खूप काळजीपूर्वक करून पाहतात, असे एका पोलीस अधिका-याने सांगितले. पूर्वी पर्यटक दलालांकडे गेले व मागणी केली की, लगेच कॉर्ल गर्ल्सचा पुरवठा केला जात असे.

मात्र पोलिसांची सक्रियता आणि सापळे रचण्याच्या पद्धती लक्षात आल्यामुळे आता लगेच दलालांकडून मुली पुरविल्या जात नाहीत. मात्र पर्यटकांकडून पैसे घेऊन व त्यांना लगेच मुली पुरविण्याची ग्वाही देऊन मोठय़ा संख्येने दलालांकडून पर्यटकांची फसवणूकच केली जाऊ लागली आहे, असे पोलीस अधिका-याने सांगितले. एकंदरीत गोव्यात आता जर कुठलाही पर्यटक गोव्यात हमखास कॉल गर्ल मिळतात असा समज करून घेऊन येत असेल तर तो मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहे, असा अर्थ काढावा लागेल. 

टॅग्स :goaगोवाCrimeगुन्हाtourismपर्यटन